Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १९ जून, २०२२

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना अग्नीपथ चा मार्ग बंद पोलिसांचे प्रमाणपत्र भर्तीसाठी अनिवार्य केंद्रित संरक्षण मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय



केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेवर होत असलेल्या टीकेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये पुन्हा चर्चा झाली.त्यानंतर काही महत्त्वाच्या घोषणा रविवारी करण्यात आल्या.त्यात लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी स्पष्ट केले की, सेनादलात शिस्तीला महत्त्व आहे.तिथे तोडफोड,दंगे करणाऱ्या तरुणांना अजिबात स्थान नाही.त्यामुळे ती व्यक्ती कोणत्याही अशा आंदोलनात,तोडफोडीत सामील नाही हे त्याला सिद्ध करावे लागेल.त्यासाठी या इच्छुक व्यक्तीने पोलिसांचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. 

त्याशिवाय,त्याला संधी नाही.अनिल पुरी यांनी पत्रकार परिषद घेत या योजनेतील महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले.पुरी म्हणाले की, सध्या काहीठिकाणी उग्र आंदोलने सुरू आहेत ती आम्हाला अपेक्षित नव्हती. पण आम्ही बेशिस्त खपवून घेणार नाही. त्यामुळेच अग्निपथ योजनेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण कोणत्याही हिंसक आंदोलनात,दंगलीत नव्हतो हे सिद्ध करावे लागेल.जर तरुणावर एफआयआर असेल तर त्यांना भर्तीत प्रवेश नाही.पुढील ४-५ वर्षांत सैनिकांची संख्या ५० ते ६० हजारांपर्यंत वाढविण्यात येईल.ती नंतर ९० हजार ते १ लाखांपर्यंतही वाढविली जाईल.सध्या आम्ही ४६ हजार जवानांचा समावेश करणार आहोत कारण आम्हाला या योजनेचा अंदाज घ्यायचा आहे,जेणेकरून त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारता येतील.या अग्निवीरांनी जर देशरक्षण करताना प्राण गमावले तर त्यांना देशासाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाबद्दल त्यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची भरपाई दिली जाईल.पुरी यांनी असेही सांगितले की,सियाचेन आणि इतर भागात सेवेत असलेल्या सैनिकांप्रमाणेच अग्निवीर सैनिकांनाही भत्ते दिले जातील. सेवाकाळात त्यांच्याबाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

यावेळी उपस्थित असलेले लेफ्ट जनरल बन्सी पोनाप्पा यांनी सांगितले की, डिसेंबरपर्यंत २५ हजार अग्निवीर नियुक्त केले जाती.आणि दुसरी तुकडी फेब्रुवारी २०२३पर्यंत भर्ती होईल. त्यातून ४० हजारांचे लक्ष्य गाठले जाईल. २१ नोव्हेंबरपासून नौदलातील अग्निवीर आयएनएस चिल्का,ओदिशा येथे प्रशिक्षणासाठी जातील. महिला आणि पुरुष अशा दोघांनाही ही संधी असेल.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध