Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ जून, २०२२

गौरव सन्मानाचा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते शिरपूर शहर पोलिसांचा सन्मान..!



शिरपूर प्रतिनिधी :- तालुक्यात उत्कृष्ट कामगीरी करीत अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्हे उघडकीस अल्पावधीतच उघडकीस आणणाऱ्या शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाचा गुरुवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्या हस्ते धुळे येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गौरव करण्यात आला.


शिरपूर शहर पोलिसांच्या शोध पथकाने मार्च २०२२ मध्ये शिरपूर तालुक्यासह धुळे नंदुरबार,जळगांव नाशिक जिल्ह्यातुन चोरीस गेलेल्या ३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १२ मोटारसायकली फक्त फोन दिवसात रात्रंदिवस करीत विविध ठिकाणाहून हस्तगत करीत चोरट्यांना जेरबंद करण्याची यशस्वी कामगिरी केली होती तसेच एप्रिल २०२२ मध्ये देखील शोध पथकाने तालुक्यातील सावळदे येथे ६ एप्रिल रोजी दुपारी राहत्या घरातच २ लाख २९ हजार रुपयांच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटासह ३७ हजाराचे साहित्य असे एकूण २ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून बनावट नोटांचा मिनीं कारखाना उध्वस्त केल्याची कामगिरी केली होती तसेच इतर अनेक गुन्हे अल्पावधीतच उघडकीस आणणाऱ्या शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेत गुरुवार ९ जून २०२२ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्या हस्ते व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या उपस्थितीत शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख,पीएसआय किरण बा-हे,शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील,लादूराम चौधरी,पोकॉ गोविंद कोळी, विनोद अखंडमल,प्रविण गोसावी,मुकेश पावरा,प्रशांत पावरा पथकाचे पोकॉ प्रशांत पवार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध