Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ जून, २०२२

साक्री तालुक्यातील शेणपूर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच श्री चंद्रकांत काळे यांची बिनविरोध नेमणूक करण्यात आली



साक्री तालुक्यातील मौजे शेणपूर गावात सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली यात श्री चंद्रकांत राजाराम काळे यांची सरपंच पदी सर्वानुमते बिनविरोध नेमणूक करण्यात आली. या कामी निवडणूक निर्णय अधिकारी श्री के. एफ. शिंदे, तलाठी जाधव आप्पा व शेणपूर ग्रामपंचायत च्या ग्रामसेविका निकम मॅडम यांच्या उपस्थितीत ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. व माजी सरपंच सौ. ललिता किरण काकुस्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर शेणपूर ग्रामपंचायत ची सरपंचची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर पंधरा दिवसांसाठी या पदावर प्रशासकाची नेमणूक साक्री पंचायत समिती यांचा कढून करण्यात आली. आणि त्यानंतर आज दिनांक 09/06/2022. रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत निवडणूक प्रक्रिया घेऊन श्री चंद्रकांत राजाराम काळे यांची नऊ पैकी सात इतक्या मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले. यावेळी शेणपूर ग्रामपंचायतीची धुरा नवनिर्वाचित सरपंच श्री चंद्रकांत काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सौ ललिता काकुस्ते यांच्या कार्यकाळातील प्रलंबित विकास कामे कोविड मूळे अर्ध्यावर थांबली होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी तसेच ग्राम विकासाच्या दृष्टीने नवीन ध्येय धोरणे व गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून श्री चंद्रकांत काळे यांनी प्रशासकीय सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की आपण शेणपूर गावाचा विकास नेहमी तत्पर राहू व गावातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना कशा पोहोचवता येतील यासाठी ही नेहमी प्रयत्नशील राहुन पुढील वाटचाल करू असे आश्वासन ग्रामस्थांना त्यांनी दिले 
याप्रसंगी गावातील जेस्ट नागरिक,ग्रामपंचायत सदस्य, सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील तरुण,महिला भगिनी, पत्रकार,व इतर हे देखील उपस्थित होते याप्रसंगी सर्वांकडून सरपंच श्री चंद्रकांत काळे याचे अभिनंदन करण्यात आले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध