Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ जुलै, २०२२

ईडी सरकारचा दुसऱ्या दिवशीच महा विकास आघाडीला दुसरा दणका 36 जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांना स्थगिती



मुंबई मिलिंद माने, शिवसेना बंडखोर व भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात आलेल्या इ डी सरकारने दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला असून 36 जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांना स्थगिती दिली आहे
राज्य नियोजन विभागाचे उपसचिव स.ह धुरी.यांनी चार जुलै रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील 36 जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत एक एप्रिल 2022 पासून आज तागायत विविध योजना अंतर्गत देण्यात आलेल्या प्रशासकीय कामांच्या मान्यतेला स्थगिती देण्यात आली आहे.

राज्यातील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी जालना औरंगाबाद नाशिक पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहमदनगर बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली या 36 जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मागील महाविकास आघाडी सरकारने एक एप्रिल 2022 पासून कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देऊन ती कामे चालू केली होती मात्र आघाडी सरकार एवढ्या लवकर कोसळेल याची कल्पना कोणालाच नसल्याने ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली होती त्या कामांची मोठ्या धुमधडाक्यात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी व आमदारांनी उद्घाटने व भूमिपूजने केली होती
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नुकत्याच दोन दिवसापूर्वी स्थापन झालेल्या शिवसेना बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने झालेल्या ईडी सरकारने सत्तेवर येतात महाविकास आघाडी सरकारला दुसरा दणका दिला आहे व राज्यातील 36 जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांना स्थगिती दिली आहे.

नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतरच महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या कामांचे भवितव्य ठरणार आहे.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने नियोजन मंडळ नियोजन विभागाचे उपसचिव धुरी यांच्या आदेशाने काढलेल्या परिपत्रकानुसार नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्ती झाल्यानंतर पूर्वीच्या आघाडी सरकारने दिलेल्या प्रशासकीय कामांची मान्यता यादी नवीन पालकमंत्र्यांच्या पुनर्विलोक नार्थ सादर केल्यानंतरच या कामांच्या मान्यते बाबत निर्णय होणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले असून त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने आपल्या कारकिर्दीत दिलेल्या प्रशासकीय काम रद्द ठरली तर जी कामे ठेकेदारांनी व कार्यकर्त्यांनी केली होती त्यांना मोठा नाहक भुर्दंड बसणार आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध