Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ जुलै, २०२२

कोकण दीप मासिकाच्या वर्धापनदीना निमित्ताने संतोष अबगुल प्रतिष्ठानला राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार



मुंबई-अक्षय कदम: कोकण दीप मासिकाच्या २० व्या वर्धापन दिनी सामाजिक,साहित्य,शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच संतोष अबगुल प्रतिष्ठान अनेक रक्तदान शिबीर आयोजित करत असते.तसेच सरकारी रुग्णालयात अडमिड होण्यासाठी संतोष अबगुल प्रतिष्ठान ची टीम मदत करत असते.संतोष अबगुल प्रतिष्ठान हे दापोली,मंडणगड,खेड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच मुंबईत पण काम करत असते.त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोकण दीप मासिकाकडून आज मुंबई दादर येथे २० व्या वर्धापनदिन निमित्ताने संतोष अबगुल प्रतिष्ठानला 

"राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार" 

हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.पुरस्कार स्वीकारते वेळी संतोष अबगुल आणि संतोष अबगुल प्रतिष्ठानची टीम उपस्थित होती.संतोष अबगुल यांनी आपले मनोगत व्यक्त करतेवेळी सांगितले की कधी रक्ताची गरज भासली की रात्री अपरात्री फोन करा मदत नक्कीच मिळेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध