Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ जुलै, २०२२
पावसाअभावी अरुणावती नदीचे पात्र कोरडे
पावसाअभावी अरुणवती नदीचे पात्र कोरडे
शिरपूर प्रतिनिधी: काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना महापूर आलेला आहे.मात्र शिरपूर तालुक्यात अजुनही अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने,तालुक्याची जीवनदायी समजली जाणाऱ्या अरुणावती नदीचे पात्र कोरडेठाक पडलेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वरूणराजा धो,धो बरसतोय.त्यामुळे केवळ नद्याच नाहीत तर नाल्यांनाही मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे . धुळे जिल्हयातही अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून पांझरेसह प्रमुख नद्यांना पूर आलेला आहे.मात्र तालुक्याची जीवनवाहिनी असलेली अरुणावती नदी अजुनही कोरडी ठाक पडलेली आहे.
नदीत पाण्याचे डबकेही साचलेले दिसून येत नाही.शिरपूर तालुक्यातील तापी नदीचा काठ सोडला तर तालुक्यातील बोराळी व थाळनेर मंडळांमध्ये अजुनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.अरुणावती नदी काढवरील गावात विहिरीनी तळ गाठल्याचे दिसून येते आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा