Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील मौजे टेंभे (भडगाव) प्र.भामेर येथील आदिवासी महिलांनी घेतली थेट साक्री पं.स. सभापती सौ. प्रतिभाताई सूर्यवंशी यांची भेट
साक्री तालुक्यातील मौजे टेंभे (भडगाव) प्र.भामेर येथील आदिवासी महिलांनी घेतली थेट साक्री पं.स. सभापती सौ. प्रतिभाताई सूर्यवंशी यांची भेट
साक्री (अनिल देसले दै. धुळे दवंडी)
साक्री तालुक्यातील मौजे टेंभे, भडगाव ही ग्रुप ग्रामपंचायत असून गेल्या कित्येक दशकांपासून टेंभे गावाचा विकास खुंटलेला आहे. ग्रामपंचायत ही भडगाव मध्ये असल्याकारणाने सरपंच ही त्याच गावाचा असल्यामुळे ग्रुपग्रामपंचायतीला आलेला संपूर्ण निधी हा फक्त भडगाव गावातच खर्च करण्यात येत आहे. आत्ता 6 महिन्यापूर्वी जल मिशन अंतर्गत टेंभे गावात अर्धी अपुरी पाईपलाईन टाकून घरोघरी नळ कनेक्शन देण्यात आले परंतु या 6 महिन्यांमध्ये निंम्या नळांना पाणीच आले नाही गावात पाणीटंचाई असल्याकारणाने आदिवासी महिलांना डोक्यावर हंडे गुंडे घेऊन दोन-तीन किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागते. याबाबत ग्रामसेवक संदीप देसले यांना वारंवार याबाबतीत तक्रारी करून देखील ग्रामसेवक हा मुजोर असल्याने कुठलीही दखल घेतलेली नव्हती. या सर्व बाबींना कंटाळून शेवटी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर यांच्या आदेशाने टेंभे गावातील आदिवासी महिलावर्ग व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी अनिल दादा देसले, प्रवीण दादा बोरसे, भैय्यासाहेब पारधे, बापू दादा ठाकरे, निलेश सोनवणे यांनी थेट पंचायत समिती सभापती सौ. प्रतिभाताई सूर्यवंशी यांची भेट घेऊन महिला वर्गाने आपले संपूर्ण समस्या सभापती ताई यांच्याकडे मांडल्या, सभापतींनी पाणीपुरवठा इंजिनियर्स व व्हिडिओ मा. सूर्यवंशी साहेब यांना बोलावून याबाबत विचारणा केली व त्यांच्याशी चर्चा करून गेल्या 6 ते 7 दिवसात टेंभे गावातील पाणी प्रश्न सोडवणार अशी ग्वाही दिली. नंतर स्वतः इंजिनियर साहेब यांच्या गाडीत काही महिलांना सोबत घेऊन टेंभे गावात जाऊन पाईपलाईन ची पाहणी करून नवीन पाईप कुठे टाकावेत कसे टाकावेत हे ग्रामस्थांच्या मदतीने करण्यास सुरुवात केली. अगर 6 ते 7 दिवसात पाईप लाईन मध्ये पाणी न आल्यास टेंभे गावाला ट्रेन करणे पाणी पुरविण्यात येईल असे पंचायत समिती सभापती सौ प्रतिभाताई सूर्यवंशी यांनी महिलांना बाही दिली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा