Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ जुलै, २०२२

मुख्यमंत्री शिंदेंचा शुभेच्छा जाहिरातीचा पोस्टरवर उद्धव ठाकरे व आदित्य टाकरेंचा फोटोने राजकीय वर्तुळात खळबळ



राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गुरुवारी संध्याकाळी राजभवनात पार पडला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. यादरम्यान, मात्र चर्चा रंगली आहे ती पुण्यातील शुभेच्छा जाहिरातीची.
या शुभेच्छा जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेसह उद्धव ठाकरे बाजूला आदित्य ठाकरे यांचा फोटो दिसून आला. यामुळे राजकीय वर्तूळात चर्चेचा विषय बनला आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारला होता. त्यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध