Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० जुलै, २०२२
आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर बाळदे येथे यात्रा उत्सवाचे आयोजन
(उंटावद वार्ताहर )शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या बाळदे येथे आषाढी एकादशीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन श्री विठ्ठल धाम ट्रस्ट बाळदे यांच्यामार्फत यात्रोत्सवाचे आयोजन दिनांक 10 जुलै रोजी वार रविवार रोजी होणार आहे श्री विठ्ठल धाम ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार नानासो संभाजीराव हिरामण पाटील व सचिव निंबा पाटील यांनी केले आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळ असल्याने यात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत होता मात्र यावर्षी सर्व निर्बंध हटविल्याने यावर्षी हजारो भाविक श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी बाळदे येथे येत असतात आषाढी एकादशी या दिवशी अनेक पायी दिंड्या जिल्ह्याभरातून येत असतात त्यांना राहण्यासाठी भव्य सभा मंडपाचे तयारी ट्रस्टने केली आहे तसेच येणाऱ्या भाविकांसाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच यात्रोत्सवानिमित्त येणारे दुकानदार फुल ,पूजा,पत्री,पाळणे, हॉटेल व जीवनावश्यक वस्तूची विक्री करणारे दुकाने यांना बाळदे ग्रामपंचायत मार्फत स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली आहे.
तसेच येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे यात्रेनिमित्त श्री विठ्ठल धाम ट्रस्ट यांनी आरोग्य सेवेची व्यवस्था केलेली आहे.
शिरपूर बस स्थानकापासून बाळदे येथे दर्शनासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे यात्रोत्सव शांततेत व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिरपूर येथील पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व पथकांची नजर राहील यात्रा उत्सवासाठी बाळदे येथील माजी आमदार संभाजीराव पाटील सचिव निंबा पाटील माजी जि.प .सदस्य जितेंद्र कुवर व बाळदे गावातील समस्या ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा