Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
दहिवेल गावात भारतीय जनता पार्टी तर्फे रास्ता रोको आंदोलन.पंधरा दिवसात काम पूर्ण झाले नाही तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार- अध्यक्ष भाजप दहीवेल शहर
दहिवेल गावात भारतीय जनता पार्टी तर्फे रास्ता रोको आंदोलन.पंधरा दिवसात काम पूर्ण झाले नाही तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार- अध्यक्ष भाजप दहीवेल शहर
दहिवेल गावात भारतीय जनता पार्टी तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दहिवेल बस स्थानकावरील रस्त्याच्या कामाच्या विलंबामुळे दहिवेल गावातील नागरिक त्रस्त असून आज भारतीय जनता पार्टी तर्फे भारतीय जनता पार्टीचे पिंपळनेर मंडल उपाध्यक्ष श्री प्रवीण दादा देसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ठेकेदाराचा प्रतीकात्मक पुतळा उभा करून ठेकेदार मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. रस्त्याची दुर्दशा पाहून दहिवेलकर नागरिकांच्या संयम सुटत चालला असून आज पिंपळनेर मंडल उपाध्यक्ष श्री प्रवीण दादा देसले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री सुनील माळी शहर उपाध्यक्ष रावसाहेब माळी पिंपळनेर मंडळ युवा मोर्चा सरचिटणीस श्री दीपक पाटील व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री प्रमोद सुरेश बच्छाव तसेच दहिवेल गावातील व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा