Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ जुलै, २०२२

कोकण दीप मासिकाच्या वर्धापनदीना निमित्ताने समाजसेवक राजेंद्र भुवड साहेबांना "कोकणरत्न पुरस्कार"



मुंबई:अक्षय कदम :कोकण दीप मासिकाच्या २० व्या वर्धापन दिनी सामाजिक,साहित्य,शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पन्हाळजे गावचे सुपुत्र राजेंद्र भुवड साहेब सामाजिक कामे करत असतात.तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदत करत असतात.त्यांना आतापर्यंत अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोकण दीप मासिकाकडून आज मुंबई दादर येथे २० व्या वर्धापनदिन निमित्ताने समाजसेवक राजेंद्र भुवड साहेबांना "कोकणरत्न पुरस्कार" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध