Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ जुलै, २०२२

धुळे तालुक्यातील न्याळोद येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन जणांवर सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल




सोनगिर प्रतिनिधी:धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जापी न्याहळोद रस्त्यावरील भरवाड वस्तीजवळील पांझरा नदी पात्रातून ट्रॅक्टरच्यसा माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करून चोरून नेणाऱ्या तिघांविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

तलाठी सुजित रामदास मोरे यांनी रविवारी रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार जापी- न्याहळोद रस्त्यांवर गस्त घालत असतांना पांझरा नदी पात्रात दोन ट्रॅक्टर अंदाजे १२ हजार रूपये किंमतीची वाळू उपसा करून चोरून नेतांना आढळून आले.या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भादंवि कलम ३७ ९ व ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे . पुढील तपास सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस स्टेशन पाटील करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध