Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ जुलै, २०२२

झेप प्रतिष्ठान तर्फे खेड तालुक्यातील ऐनावरे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप..!



खेड(अक्षय कदम/सुदर्शन जाधव)
झेप प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य गेली कित्येक वर्षे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर,ठाणे,पालघर, मुंबई तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असते.थंडीच्या दिवसात गरीब लोकांना चादर आणि बँकेट वाटप करत असते. कोरोनाच्या काळात जवळजवळ 1000 च्या आसपास अन्नधान्य किट झेप प्रतिष्ठान तर्फे वाटप करण्यात आली होती.जून महिन्यात शाळा सुरू झाल्या की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज भासते हे लक्षात घेऊन झेप प्रतिष्ठान मार्फत खेड तालुक्यातील ऐनावरे शाळेत १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी झेपचे सदस्य देवानंद जाधव आणि शुभमसेन हळदे उपस्थित होते.या उपक्रमासाठी मदत करणारे सर्व दानशूर व्यक्तीचे झेप प्रतिष्ठान तर्फे आभार मानण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध