Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ जुलै, २०२२

शिवशंभूराजे मित्र मंडळ रसाळगड (मुंबई) मंडळाकडून खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..!



खेड:अक्षय कदम:शिवशंभूराजे मित्र मंडळ रसाळगड मुंबई मंडळाकडून खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना शैक्षणिक साहित्य वाटप वह्या-पेन सर्व विद्यार्थ्यांना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा शाळानां देण्यात आली आहे.

शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.घेरा रसाळगड नं १ मुख्याध्यापिका सौ यादव मॅडम,
जैतापूर शाळा नं १मुख्याध्यापक श्री कडु सर,केंद्र शाळा निवचीवाडी मुख्याध्यापिका सौ सुशमा बने मॅडम,पेठ किल्ले बौद्धवाडी शाळा मुख्याध्यापक श्री पावरा सर उपस्थित होते.शिवशंभूराजे मित्र मंडळ रसाळगड मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री विलास शिंदे,
उपाध्यक्ष श्री सुनिल सकपाळ,सचिव श्री प्रकाश सावंत,खजिनदार श्री गणेश सावंत,सेक्रेटरी श्री अंकुश सकपाळ,
सदस्य श्री लव सकपाळ हे सर्व उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध