Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २० जुलै, २०२२
अंगणवाडी पोषण आहार प्रशिक्षण संपन्न..!
नंदुरबार, दि.20(प्रतिनिधी)अन्न व औषध प्रशासन,नंदुरबार तसेच महिला व बाल विकास विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृषि विज्ञान केंद्र,कोळदा येथे धडगाव व शहादा तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे पोषण आहार संदर्भात प्रशिक्षण संपन्न झाले.
या प्रशिक्षण शिबिरास उप मुख्यप कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास ) के.एफ राठोड,अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे,अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार,अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.
या प्रशिक्षणात पोषण आहारातील जीवनसत्वांची कमतरता भरुन काढण्यासाठीचे उपाय, समतोल आहार पद्धती,फोर्टीफाईड तांदुळ,जंक फुड खाण्याचे दुष्परिणाम,आहारातील तेल, मीठाचे प्रमाणाबाबत अंगणवाडी पर्यवेक्षिकांना चित्रफितीद्वारे श्री. कांबळे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या शंकाचे निराकरण करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा