Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २० जुलै, २०२२
अन्न व औषध प्रशासनामार्फत धडगाव येथे अन्न परवाना व नोंदणी शिबिर संपन्न..!
नंदुरबार, दि.20(प्रतिनिधी)अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना अन्न परवाने व नोंदणी प्रमाणपत्र जागेवर उपलब्ध करुन देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत धडगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या ज्या व्यावसायिकांनी संगणकीय प्रणालीवर नोंदणी केली अशा व्यवसायिकांना 18 अन्न परवाना व 23 नोंदणी प्रमाणपत्र देण्या्त आले.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांना अन्न परवाने व नोंदणी करणे आवश्यक आहे. विनापरवाना अन्न व्यवसाय करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यासाठी व्यवसायिकांना सहा महिन्यापर्यंत शिक्षा व रुपये 5 लाखापर्यंत दंडाची रक्कम आकारण्याबाबत कायद्यात तरतूद आहे.
जिल्ह्यातील अद्यापही ज्या अन्न व्यवसायिकांनी अन्न विक्री परवाना घेतला नाही अशांनी https://focus.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करुन परवाना व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.विना परवाना अन्न व्यवसाय विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात येईल. असे सहायक अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा