Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १४ जुलै, २०२२

शिरपूर शहरात रामसिंग नगर गावठी कट्ट्यातून गोळी झाडत तरुणाची आत्महत्या



शिरपूर प्रतिनिधी:शहरातील रामसिंग नगर येथील हर्षल भिका माळी या 24 वर्षांच्या तरुणानं बुधवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय. स्वतःच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी घालून त्यानं आत्महत्या केलीय.

रामसिंग नगर येथील हर्षल माळी 24 या तरुणाने रात्री 11 वाजता घराच्या किरकोळ वादातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची या घटनेने शहरासह रामसिंग नगर परिसरात खळबळ माजली आहे हर्षल ला उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे वडील भिका माळी यांनी दाखल केले डोक्यातून रक्त प्रवाह अधिक जात असल्यामुळे रुग्णालयातील डॉ कदम यांनी पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले होते परंतु डोक्यातून रक्त प्रवाह जास्त जात असल्यामुळे हर्षल माळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हर्षल शिरपूर शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध