Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तरुण गर्जना वृत्तपत्र समूह कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तरुण गर्जना वृत्तपत्र समूह कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज 21जुलै विद्यमान व माजी उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस दोन्ही नेत्यांचा वाढदिवस हा योगायोग असावा कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि भाजपचे स्वर्गीय नेते गोपीनाथजी मुंडे दोन्ही एकमेकांचे राजकीय विरोधक दोघांचा वाढदिवस 12 डिसेंबरला असतो परंतु दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असणे हा योगायोग असावा आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब हयात नाही आज 21 जुलै उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आहे.दोन्ही नेते एकमेकांचे राजकीय विरोधक फक्त पाहटेचा शपथविधी अपवाद वगळता दोन्ही नेत्यांना समाजकारण, राजकारणाची खुप तळमळ आहे दोन दिवसांपूर्वीच सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले याचा आनंद सर्वांना झाला व सुप्रीम कोर्टाचे आभारही मानले त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवाद सुरु झाला आतांच सत्तेवर आलेल्या सरकारने पंधरा दिवसांत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून दिले तर माविआ सरकारच्या पाठपुरावाने आरक्षण मिळाले असा दावा विरोधकांचा आहे तसा प्रकार सोशल मीडियावर दिसला आरक्षण कुणी मिळवून दिले हे सत्ताकारणात महत्त्वाचे आहे ज्यांनी मिळवून दिले त्यांचे आभार परंतु धनगर आरक्षण अंमलबजावणीचे काय? झाले राज्यात लोकसंख्येच्या मानाने नंबर दोन वरती धनगर समाज आहे 2014 पुर्वी केंद्रात आणि राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार होते. त्यांनी धनगरांना आरक्षण दिले नाही म्हणून धनगरांनी बारामती मध्ये राज्यव्यापी आंदोलन उभे केले त्यावेळी विरोधी पक्ष भाजप व शिवसेनेच्या वतीने आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले होते की आमचे सरकार आले तर पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगरांना आरक्षण देणार असे आश्वासन दिले होते त्यामुळे धनगरांनी अपेक्षापोटी भरभरून मतदान दिले आणि भाजप व शिवसेना पक्षाचे सरकार सत्तेवर आले तेव्हा पासून तर आजपर्यंत धनगरांना आरक्षण मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात बसले त्यांनाही वाटले की धनगरांना आरक्षण द्यावे म्हणून अधिवेशन काळात पिवळेफेटे खांद्यावर घोंगडी घेत आंदोलन केले सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची भूमिका धनगरांना आरक्षण द्यावे अशी आहे तर अडवले कुणी असा प्रश्न उपस्थित होतो पाच वर्षे सत्ता असतांना आरक्षण देता आले नाही त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले धनगरांचे आरक्षणाला पाठिंबा आहे असे म्हणणारे तीन पक्ष मिळुन सत्तेवर आले होते तरी धनगरांना आरक्षण मिळाले नाही तर विरोधात भाजपा होती.ज्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण दिले त्यांनी धनगरांना आरक्षण का? दिले नाही असा प्रश्न उपस्थित होतो असो आता पुन्हा भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन सत्तेवर आलेत त्यावेळी पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देणार होते म्हणून देवाने पुन्हा संधी दिली जे आश्वासन तेव्हा पुर्ण करता आले नाही ते आश्वासन ईच्छाशक्ती असेल तर आता पुर्ण करता येईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहमत आहेत तर माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षात असतांना धनगरांना आरक्षण द्यावे अशी मागणी अनेक वेळा केली आहे योगायोग आज विरोधी पक्षनेते आहेत म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांची भुमिका धनगरांना आरक्षण देण्याची आहे. ज्याप्रमाणे ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि श्रेय घेतले त्याचप्रमाणे धनगरांना आरक्षण मिळवून श्रेय घ्यावे दोन्ही राजकीय पक्षाचे विद्यमान नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यावे याचं वाढदिवसा निमित्त मनपूर्वक शुभेच्छा....
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
शिरपूर प्रतिनिधी:प्रियदर्शनी मूकबधिर विद्यालय शिरपूर जिल्हा धुळे मुलांच्या शैक्षणिक,बौद्धिक विकास व करमणूक व्हावी या दृष्टिकोनाच्या हेतूने र...
-
शिरपूर : (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आशितोष बहूद्देशिय संस्था शिरपूर संचलित प.पू.साने गुरुजी माध्य.वि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा