Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २१ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यात बाभळे गावात बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट ! आरोग्य विभाग याकडे लक्ष देवून फौजदारी गुन्हा दाखल करेल काय ??
शिंदखेडा तालुक्यात बाभळे गावात बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट ! आरोग्य विभाग याकडे लक्ष देवून फौजदारी गुन्हा दाखल करेल काय ??
तरुण गर्जना वृत्तसेवा शिंदखेडा
प्रतिनिधी शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील बाभळे गावात बंगाली डॉक्टरांनी अक्षरश : हैदोस सुरु केला असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.शासनाकडून वेळोवेळी बोगस डॉक्टर विरोधात कारवाईसाठी मोहीम राबविण्याबाबत सूचना दिल्या जातात.तरी देखील शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी या बंगाली बोगस डॉक्टरांच्या तक्रारी काही कमी नाहीत.
तसेच डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद,महाराष्ट्र भारतीय चिकित्सा परिषद,महाराष्ट्र समचिकित्सा परिषद,तसेच महाराष्ट्र दंतवैद्यक परिषद या चार पैकी कोणत्याही परिषदेकडे आपली नोंदणी करणे आवश्यक असते.या परिषदांनी त्यासाठी मान्यता दिल्यानंतर डॉक्टरांना आपला व्यवसाय सुरूकरून रुग्णांची तपासणी करता येते.मात्र यापैकी एकाही परिषदेकडे नोंदणी न करता या बंगाली डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू केली जाते.कोरोनामुळे जिल्ह्यासह तालुक्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतलेली होती.
त्याचा फायदा ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांनी उचलला.विशेषतःअशिक्षित जनतेचा गैरफायदा घेत या बोगस डॉक्टरांनी कोरोना काळात आपली पोळी भाजून घेतली.बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्यासाठी नियुक्त असलेली समिती केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे.
या बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाटामुळे बाभळे परिसरातील नागरिकांना बोगस व चुकीची ट्रीटमेंटमुळे त्रास सहन करावा लागत आहे.बनावट डिग्रीच्या आधारे तात्पुरता दवाखाना सुरू करून उपचार करण्याचे आमिष त्यांच्याकडून दाखविले जाते . सर्दी,खोकला तापावर औषधी दुकानात मिळणाऱ्या गोळ्या औषधांचा वापर करून या डॉक्टरांकडून उपचार केला जातो.त्यात रोगाचे निदान होत नसल्याने अनेकांना आपला नाहक त्रास सहन लागत आहे.
बाभळे येथे पडक्या घरात अगदी मिशरुडही फुटलेले नाही असा कमी वयाचा मुलगा डॉक्टरची प्रॅक्टीस करत आहे तरीही प्रशासनास याची साधी दखलही घ्यावीसी वाटत नाही . याचे दुष्परीणाम काय होतील याचे भानही प्रशासनास राहीलेले दिसून येत नाही.
बोगस डॉक्टरकडून कोणत्याही आजारावर एकच उपचार पद्धत सुरू असल्याने किरकोळ आजारी असलेले रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.आरोग्य विभागाकडून या डॉक्टरांवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी परिसरातील जनतेतून होत आहे.
( पुढील अंकात सविस्तर वाचा )
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
साक्री प्रतिनिधी / साक्री पांझरा कान साखर सह. कारखान्याच्या आवारात भव्य असा शेतकरी मेळावा घेण्यात आला या यावेळी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा