Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची सेतू केंद्रावर गर्दी



शिंदखेडा प्रतिनिधी:शेतकऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्यानंतर त्यांना मदत दिली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मदत करण्याचा पर्याय आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वतःहून पिक विमा करण्यास सुरुवात केली असून पिक विमा भरण्यासाठी सेतू केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे एक जुलैपासून खरीप पिक विमा भरणे सुरू झाले असून शासनाने आता जिल्हानिहाय पूर्वीच्या कंपन्या बदलून नव्या कंपन्यांना प्राधान्य दिले आहे. 

त्यामुळे शेतकऱ्याचा विमा दाव्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून आता लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान शिंदखेडा येथील सेतू कार्यालयात शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे सुरू केले असून नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी दुष्काळ यामुळे पिकांचे नुकसान भरपाई साठी पिक विमा उतरवला जातो शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रांमधून व सेतू यांच्या माध्यमातून पिकांचा विमा भरावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांनी केले आहे 

शिंदखेडा येथील सेतू केंद्रावर तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे मंडळ कृषी अधिकारी एन एम साबळे चिमठाणे मंडळाचे कृषी अधिकारी बी जी वाघ राजेंद्र बाविस्कर यांनी भेट दिली याप्रसंगी सेतू केंद्राचे संचालक विनायक पवार ऑपरेटर समाधान मराठे सुरेश बोरसे निखिल शिंदे राहुल गिरासे आदी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना खरीप पिक विमा भरला चे फॉर्म तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांच्या हस्ते देण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध