Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २३ जुलै, २०२२
भूम येथे रक्तदान शिबीर संपन्न...
भूम (राहूल शिंदे) दि.२२ येथे विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य (धाराशिव) व मनगिरे परिवार यांच्या संयुक्त विद्यामाने शिवैक्य लक्ष्मीबाई मधुकर मनगिरे यांच्या पुण्यस्मरणा निमीत्त शुक्रवार रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. भारतातील सगळ्यात लहान (२१ वर्षे) कमी वयाची महाराष्ट्रतून, धाराशिव जिल्ह्यातील ,भूम तालुक्यातील, ग्रामीण भागातील ,पखरुड येथील नवनियुक्त चिफ इनफॉरमिशेन सिक्युरिटी ऑफिसर पुजा आश्रुबा चव्हाण यांनी शिवैक्य लक्ष्मीबाई मधुकर मनगिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ, आयोजित कार्यक्रमात प्रतिमेचे पूजन व श्रीफळ वाढवून रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांचा व आई-वडिलाचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर पुजा आश्रुबा चव्हाण नवनियुक्त चिफ इनफॉरमिशेन सिक्युरिटी ऑफिसर झाल्या बद्दल त्यांच्या आई आईवडीलसह विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र (धाराशिव) व मनगिरे परिवाराने त्यांचा सत्कार केला. यावेळी सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य (धाराशिव), नगराध्यक्ष संजय गाढवे (गटनेते न.प.भूम) ,दिलीप शाळू जिल्हा प्रमुख शिवसेना किरन जाधव, डॉ.सुप्रिया शेटे, डॉ.कोल्हे मनोज, डॉ.रेणुका बिराजदार, मधुकर मनगिरे, सिध्देश्वर मनगिरे, उमेश मनगिरे, डॉ.खोले, डॉ.अंबुरे, प्रल्हाद आडागळे ,अनिल मोटे सर, अशोक तोडकर, नातेवाईक, सोलापूरे काका, ओम महाराज, कैलास घेवारे , सर्व मित्र परिवार व समाजबांधव उपस्थित होते.ब्लड संकलन भगवंत ब्लड बँक बार्शी यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा