Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ जुलै, २०२२

लेख :- डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लांडोर बंगला लळींग, धुळे ‌




धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९३७ साली भेट दिली होती. त्यानी तीन दिवस धुळे शहरातील लळींग किल्ल्याजवळील लांडोर बंगला येथे मुक्काम केल्याचे इतिहासात नमूद आहे. 

पोळा सणात कोणाच्या बैल पुढे असावा या वादावरून शिरपूर न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर युक्तीवाद करण्यासाठी पी.ए.तवर यांच्या वकिल या नात्याने खटला चालविण्यासाठी ३१ जुलै १९३७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर धुळे शहरात आले. मुंबई ते धुळे असा रेल्वे प्रवास त्यांनी केला होता. 

शिरपूर येथील त्यांचे न्यायालयीन कामकाज पूर्ण करून त्यांनी धुळे शहरातील संदेश भुमी ट्रावेल्स बंगला येथे पहिले भाषण केले व शहरातील विजयांनद चित्रमंदिर येथील सभागृहात जाहीर सभा घेवून बाबासाहेब यांचे भाषन झाले होते.दलित जनतेला मार्गदर्शन केले.त्यानंतर बाबासाहेब धुळ्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग येथील विश्वासू सहकारी पुनाजी आण्णा लळींगकर यांच्या सोबत लळींग येथील लांडोर बंगला येथे गेले. आपले आयुष्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वाहणाऱ्या बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी पुनाजी आण्णा लळींगकर यांची ओळख होती. त्यांच्या कणखर आवाज व तेवढेच कणखर नेतृत्व ते अधिकच प्रसिद्ध होते. निळी टोपी पांढरा नेहरू शर्ट पांढरा पायजामा खांद्यावर घोंगडी हातात ८ इंच ची काठी असा त्यांच्या पोषक होता. त्यांना बाबासाहेबांनी खान्देश च्या वाघ हि पदवी दिली होती. ते फौजी होते त्यांना बाबासाहेबांच्या उजव्या हात देखील म्हंटले जायचे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी या पार्टीचे हि नेतृत्व आण्णासाहेब पुनाजी लळींगकर यांनी केले होते. पुनाजी आण्णा लळींगकर यांच्या हट्टा मुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी लळींग गावाला भेट दिली होती. बाबासाहेब यांनी भोजन करून लांडोर बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करण्यात आल्या होत्या. या तीन दिवसांच्या मुक्कामात बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना, समाजाला आणि महिलांना मार्गदर्शन केले होते.

बाबासाहेबांचा आगमनाची बातमी कळताच धुळे शहरातील व लळींग परिसरातील अनेक गावाच्या असंख्य नागरिकांनी लांडोर बंगल्यावर मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली होती. बाबासाहेबांची अहिराणी गाणी म्हणत हातात रूमाल मध्ये बोंबील ची चटणी, कांदा व बाजरी ची भाकरी हे भोजन घेऊन महिला लांडोर बंगला येथे पोहोचल्या होत्या. उपस्थित जनसमुदाय पाहुन जनसमुहाला संबोधित करून आपला अनमोल संदेश बाबासाहेबांनी दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की अंधश्रद्धा मोडा व आपल्या मुले बाळांना शिकवा मुले शिकलीत तर सामाजिक परिवर्तन होऊन मोठी क्रांती घडेल असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला होता.

डॉ बाबासाहेबांच्या या बंगल्याच्या वास्तुस भेट देण्यासाठी असंख्य पर्यटक येतात. दर वर्षी ३१ जुलै या दिवशी लळिंग येथील लांडोर बंगला परिसरात मोठ्या उत्साहात भीम स्मुती यात्रा भरते व विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते.

डॉ.बाबासाहेबांनी ज्या बेडवर विश्राम केला होता. तो बेड देखील जतन करण्यात आलेला आहे. तसेच अलीकडे त्याच खोलीत बाबासाहेबांचा एक सुंदर अर्धकृती पुतळा देखील बसविण्यात आलेला आहे.

३१ जुलै १९९२ पासून प्राध्यापक जे.जी. खैरनार यांनी यात्रेची सुरुवात केली आहे. आज या यात्रेचे ३० वे वर्षे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला जवळपास आज ८५ वर्षे पूर्ण होत आहेत.

ज्या प्रकारे चैत्यभूमी दादर मुंबई, महु जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी तर थेट स्मृतीभूमी म्हणून ओळखलं जावं अशी तमाम दलित बांधवांची इच्छा आहे म्हणून बाबासाहेबांनी जो परिवर्तनाच्या संदेश या ठिकाणी दिला होता त्याला उजाळा देण्यासाठी व त्याचे पवित्र स्मृती जपण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी 31 जुलै रोजी देशभरातून असंख्य दलित बांधव अभिवादन करण्यासाठी येत असतात. सर्व बहुजन समाजातील लोक, दलित नेते विविध संघटनांचे पदाधिकारी येऊन अभिवादन करतात.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यात का आले हि माहिती सर्वांना व्हावी व समाजात परिवर्तन घडून हि माहिती जन सामान्यान पर्यंत पोहचावी हि अपेक्षा व प्रयत्न सदिच्छा..

३१ जुलै रोजी भिमस्मृती मेळाव्यास येणाऱ्या सर्व भिम अनुयायांना मंगलमय शुभेच्छा..

नमो बुद्धाय..
     जय भिम..


लेख :

अजय नवल कढरे,विद्यार्थी 
 टेंभे बु ता शिरपूर जि धुळे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध