Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ जुलै, २०२२

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आशितोष बहूद्देशिय संस्था शिरपूर संचलित प.पू.साने गुरुजी माध्य.विद्यालय हिंगोणीपाडा येथे वह्या व पेन वाटप कार्यक्रम संपन्न



शिरपूर : (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आशितोष बहूद्देशिय संस्था शिरपूर संचलित प.पू.साने गुरुजी माध्य.विद्यालय हिंगोणीपाडा ता. शिरपूर जि.धुळे येथे वह्या व पेन वाटप कार्यक्रम संपन्न झाला. दि.२७ रोजी प.पू.साने गुरुजी माध्य.विद्यालय हिंगोणीपाडा येथे विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपजिल्हा प्रमुख भरत राजपूत व प्रमुख पाहूणे तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा, संस्थेचे अध्यक्ष एस.टी.महाले सर, तालुका प्रमुख दिपक चोरमले, मुकेश शेवाळे, मंगलसिंग भोई, रुपसिंग पावरा, जितेंद्र पाटील, सुकलाल पावरा, रविंद्र पावरा, शुभम पावरा, होल्या पावरा, अमोल पावरा, दिनेश गुरव, शिवसेना कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा यांनी स्व खर्चाने गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व व शिक्षणाचा प्रवाहात येण्यासाठी मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.के.
देशमुख यांनी केले.फलक लेखन श्रीमती व्ही.टी.ढोले यांनी तर आभार प्रदर्शन ओ.एस.पावरा सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए.एस.वाडीले, धनराज भोई, सोनवणे सर,वाडीले आर.एस.मॅडम, सुनिल पाटील,अनिल राजपूत, मोहन गायकवाड यांनी अनमोल सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध