Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ जुलै, २०२२

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता. ?



मुंबई मिलिंद माने महाविकास आघाडी सरकार गेले अन शिंदे सरकार राज्यात अस्तित्वात आल्याने तसेच मागील एक वर्षापासून रिक्त असणारे विधानसभा अध्यक्षपदावर नगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात येत आहे
महाराष्ट्र विधान विधानसभेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस नेते नाना पटोले यांची वर्णी लागल्यानंतर काही कालावधीनंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व ते काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष पद बरात काळ रिक्त होते आता महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिंदे सरकार मधून या पदावर नगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागणार आहे
राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातील मोठे प्रस्थान काँग्रेस शिवसेना व भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे 15 जून 1959 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा जन्म झाला होता त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रवरानगर येथे प्रथम पब्लिक स्कूल चालू केले याच शाळेत . त्यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर ते धुळे व कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना सामाजिक कार्याकडून राजकीय क्षेत्राकडे पदार्पण केले 1986 मध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी सामाजिक उपक्रम राबवत भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी काढली होती सन 1994 मध्ये त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रथम विधानसभेची निवडणूक लढवली त्यानंतर त्याचा राजकीय आज पर्यंत चालू आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील व तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी देखील आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी राजकारणात कधी मागे वळून पाहिले नाही काँग्रेस शिवसेना व भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे शिंदे सरकार मधील ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्याचे भाजपा गोटातून निश्चित झाले आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध