Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १९ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
चोपडा तालुक्यातील चहार्डी ग्रामपंचायत लिपिकाने अधिकार नसतांना दप्तरात केली फेरफार…! फसवणुक व बनावटी प्रकरणी लिपिका विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!
चोपडा तालुक्यातील चहार्डी ग्रामपंचायत लिपिकाने अधिकार नसतांना दप्तरात केली फेरफार…! फसवणुक व बनावटी प्रकरणी लिपिका विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!
चोपडा प्रतिनिधी :–चोपडा तालुक्यांतील चहार्डी ग्रामपंचायत येथील लिपिक पंकज देवराम कोळी याने स्वतःचे आर्थीक फायदयासाठी त्याच्या पदाचा दुरुपयोग करुन, दि.१३ जुलै रोजी त्यास चहार्डी ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचे अधिकार दिलेले नसतांना त्याने ग्रामपंचायत कार्यालयातील प्रोसीडींग व मासिक सभे मध्ये ठराव करुन बोजा उतरविणे अपेक्षित असताना त्याने दिनांक २६ मार्च २०२२ रोजीच्या मासिक सभेत ठराव क्रंमाक ४/३६ येथे फेरफार नोंद करुन तसेच नमुना नंबर ८ मध्ये घर क्रंमाक २२२३ व २२२८ वरील बोजे उतरुन फिर्यादी कुंदन उत्तम कुमावत (ग्राम विकास अधिकारी ) व ग्रामपंचायत कार्यालयाची फसवणुक केली म्हणुन ग्राम विकास अधिकारी यांच्या फिर्यादी वरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात लिपीक पंकज देवराम कोळी विरुद्ध गु. र.नं.सी सी टी एन एस भाग ५ २८९/२०२२ भादवी कलम ४२०,४६५,४६८,४७१प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पदाचा दुरूपयोग, ग्रामपंचायतीची फसवणुक व बनावटीकरण प्रकरणी लिपिका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप राजपूत करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा