Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २१ जुलै, २०२२

शिंदखेडा तालुक्यातील महसुल अधिकाऱ्यांना दुसऱ्यांचा अधिकार वापरण्याची घाण सवय एक सर्कल निलंबीत तर तलाठी व तहसिलदार यांच्यावर कारवाईची टांगती तलवार



तरुण गर्जना वृत्तसेवा शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी गावाच्या हद्दीतील गट नंबर ६४ नरडाणा - बोरविहीर नवीनतम रेल्वेमार्गाकरीता प्रस्तावित भुसंपादन क्षेत्रातील आहे.या जमिनीच्या हस्तांतरण बंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी शिरपूर यांनी १ ९ जानेवारी २०२२ रोजी दिले आहेत.मात्र असे असतांना कलमाडी येथील तलाठी यांनी २६१ ९ ची नोंद घेतली,ती मंडळाधिकारी नरडाणा यांनी मंजूर केली.

या गैरकारभाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नरडाणा मंडळ अधिकारी एस.बी. जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करत खाते अंतर्गत चौकशी प्रस्तावीत केली आहे.या गैरप्रकाराच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय बगदे यांनी तक्रार केली आहे.शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील गट.नं. ६४ ही जमीन कुळकायद्याच्या नियंत्रित सत्ता प्रकाराची जमीन आहे अशा जमिनीच्या वर्ग बदलाचे अधिकार
जिल्हाधिकाऱ्यांना आहेत त्यांनी त्यांच्याकडील अधिकार हे उपविभागीय अधिकारी यांना प्रदान केले आहेत . नियंत्रीत कुळकायद्याच्या नियंत्रीत सत्ता प्रकारच्या जमीनी हस्तांतरणाचे अधिकार नसतांना शिंदखेडा तहसिलदार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून नियंत्रीत सत्ता प्रकारच्या जमीनीचा भोगवटदार वर्ग २ ऐवजी भोगवटदार वर्ग १ करण्याचा आदेश १ ९ जानेवारी २०२२ रोजी दिला याच दिवशी उपविभागीय अधिकारी शिरपूर यांनी कलमाडी येथील गट नंबर ६४ चा समावेश बोरविहीर नरडाणा प्रस्तावीत रेल्वेमार्गासाठी प्रस्तावीत भूसंपादन क्षेत्रात असल्याने हस्तांतरणास बंदीचा आदेश दिले.कलमाडी तलाठी यांनी फेरफार नोंद क्रमांक १६१८ नुसार इतर हक्कात नोंद घेतली.त्याच दिवशी मंडळ अधिकारी नरडाणा यांनी ही नोंद मंजूर केली.

तर दुसरीकडे त्याच दिवशी कलमाडी येथील ही जमीन दुय्यम निबंधक शिंदखेडा यांच्याकडे खरेदीने घेण्यात आली.त्या नंतर त्याच दिवशी तलाठी कलमाडी यांनी फेरफार नोंद क्रमांक २६१ ९ घेतली.त्या नोंदीवर भिलाजी पाटील व पुनमचंद पाटील यांनी हरकत घेतली.या हरकतीवर तहसिलदारांकडे सुनावणी झाल्यानंतर तहसिलदारांनी हरकत फेटाळत २६१ ९ ही नोंद मंजूर केली..त्यानंतर नरडाणा मंडळाधिकाऱ्यांनी २१ जून रोजी २६१ ९ ही फेरफार नोंद मंजूर केली.मुळात उपविभागीय अधिकाऱ्यांनी जो गट हस्तांतरणास प्रतिबंध केल्याचे आदेश दिले होते.तरी देखील नोंद मंजूर केल्याने निलंबन केले.या कालावधीत साक्री तहसिल कार्यालयात मुख्यालय देण्यात आले आहे.

( सविस्तर पुढील अंकात )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध