Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २१ जुलै, २०२२

रस्त्याअभावी गर्भवतीचा तीन तास झोळीतून प्रवास; नंदुरबार जिल्ह्यातील घटना



नंदुरबार - तळोदा (प्रतिनिधी) तालुक्यातील कुवलीडाबर येथील रहिवासी गरोदर माता विमल वसावे हिला प्रसूतीसाठी वेदना सुरू झाल्याने, पुढील उपचारासाठी तीन तास पायी झोळी करून आणावे लागत असल्याचे हृदयद्रावक चित्र, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सातपुड्याच्या दुर्गम भागात पाहायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गरोदर माता विमल वसावे हिला सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी तळोदा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे, गरोदर मातेची प्रकृती स्थिर आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना,सातपुड्यातील गंभीर समस्यांना अधोरेखित करणारा गंभीर प्रकार समोर आला आहे.रस्ता नसल्याने गर्भवती मातेला प्रसूतिकळांसह सातपुड्याच्या दुर्गम भागातून बांबूलन्स अर्थात झोळीच्या साहाय्याने सहा किलोमीटर दरीतून प्रवास करावा लागला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध