Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ जुलै, २०२२

शिंदखेडा शहरात भगवा चौफुली ते स्वामी समर्थ मंदिर वरुड रोड हा रस्ता खूपच खराब झाला आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेसमोर उभा



शिंदखेडा प्रतिनिधी: शहरात भगवा चौफुली ते स्वामी समर्थ मंदिर वरुड रोड हा रस्ता खूपच खराब झाला आहे रस्त्यात मोठमोठे खड्डे रस्त्याचा मध्येच पाण्याचे टपके साचले आहेत त्यामुळे रस्ता वर शाळेतील मुला मुली ची तसेच कॉलनीतील नागरिकांचा वापर पण याच रस्त्याने होत असतो तसेच छोटे मोठे व्यावसायिक वरुड चौगाव जोगशेलु येथील लोकांचा पण प्रवास होत असतो त्यामुळे काही वेळेस रस्त्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे अपघात होऊन जिवंत हानी होऊ शकते म्हणून

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदखेडा शहराच्या वतीने बॅनर लावण्यात आले येणाऱ्या काळात काही झाले तर याला जबाबदार कोण ?

म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदखेडा शहराच्या वतीने आंदोलन बॅनर लावून आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रवीण पाटील.युवक शहराध्यक्ष गोलू देसले.युवक उप शहराध्यक्ष चेतन देसले.ग्रंथालय जि.दीपक राव जगताप .ग्रंथालय ता.हर्षदीप वेदें.शिवसेनेचे एच डी पाटील.रहीम खाटीक.महेश सोनवणे.अतुल पवार.तसेचन परिसरातील नागरिक तसेच महिलांनी हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशा भावना व्यक्त केल्या..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध