Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २० जुलै, २०२२
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी
नंदुरबार, दि.20(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 पर्यंत उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तसेच 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 पर्यत माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.
श्रीमती डी.आर हायस्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज,नंदुरबार, वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहादा, न्यु इंग्लिश स्कुल व ज्यु.कॉलेज अक्कलकुवा,श्रीमती पी.ए.सोढा सार्वजनिक हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय,नवापुर अशा 4 उपकेंद्रावर इयत्ता 12 वी परीक्षा घेण्यात येणार आहे.तर यशवंत विद्यालय खोडाईमाता रोड, नंदुरबार व म्युनिसिपल न्यु इंग्लिश स्कुल, शहादा अशा 2 उपकेंद्रावर इयत्ता 10 वीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 व 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीतील दहावी व बारावीच्या परिक्षेच्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये.सदरचे आदेश परिक्षार्थी,नियुक्त कर्मचारी,अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही.तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन,एस.टी.डी, आय.एस.डी,फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने,कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत,असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा