Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांसह दहा पिडीत महिला ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची नंदुरबार शहरात धडक कारवाई..!
नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांसह दहा पिडीत महिला ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची नंदुरबार शहरात धडक कारवाई..!
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दूध डेअरीजवळ दोन महिला इतर काही पिडीत महिलांकडून पैसे घेवून त्यांचेकडून अनैतिक व्यवसाय करुन घेवून गैरकायदेशीर कुंटणखाना चालवीत आहेत.त्यामुळे या गोष्टीचा परिसरात असलेल्या शाळा महाविद्यालयातील मुले मुली यांचेवर वाईट परिणाम होत असलेबाबत व सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना प्राप्त झाली होती.
दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दुध डेअरी जवळ दोन महिला ह्या इतर काही महिलांकडून पैसे घेवून त्यांचेकडून अनैतिक व्यापार करुन घेवून गैरकायदेशीर कुंटणखाना चालवीत आहेत अशी माहिती मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना यांच्या नेतृत्त्वाखाली पथक तयार करुन सदर ठिकाणाची माहिती संकलित करून सदर ठिकाणी एकाचवेळी तपासणी करून ठोस कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दूध डेअरीजवळ सुरु असलेल्या कुंटणखान्यावर अचानकपणे छापा मारण्याचे नियोजन केले सर्व कायदेशीर पत्रव्यवहार करुन जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील परिविक्षा अधिकारी व संरक्षण अधिकारी यांना सोबत घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविद्र कळमकर व पथक नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या आजुबाजूला सापळा लावून होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीची अधिक खात्री करण्यासाठी एक पेंटर ग्राहकास सदर ठिकाणी पाठविले.पंटर ग्राहक यांनी सदर ठिकाणी असलेल्या दोन महिलांशी बोलणी करून त्या महिलांना रोख रक्कम दिली.बातमीची खात्री झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी 6.30 वा.सुमारास सदर ठिकाणी छापा टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिला आरोपीना ताब्यात घेतले.तसेच सदर ठिकाणी असलेल्या रुमची पाहणी केली असता त्याठिकाणी 4 x 6 आकाराचे काही लहान लहान रूम दिसून आले.
त्या रुमची पाहणी केली असता तेथे वेगवेगळ्या राज्यांमधून पैसे घेवून अनैतिक व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या 10 पिडीत महिला मिळून आल्या.दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिला आरोपी ह्या वेगवेगळ्या राज्यांमधून अनैतिक व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या कडून पैसे घेवून त्यांना अनैतिक व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून त्यांचेकडून उपजिविका भागवित असतांना मिळून आल्याने कुंटणखाना चालविणार्या दोन महिला आरोपीविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 550/2022 अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच 10 पिडीत महिलांची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे करुन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना सखी वन स्टॉफ सेंटर,जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी दाखल करण्यात आलेले आहे.आज दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिला आरोपी व वेगवेगळ्या राज्यांमधून अनैतिक व्यापार करण्यासाठी आणलेल्या 10 पिडीत महिलांची जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे सविस्तर वैद्यकय तपासणी करून
दोन महिला आरोपी व 10 पिडीत महीलांना मा.न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.त्यानंतर न्यायालयाचे आदेशान्वये 10 पीडित महीलांना धुळे येथील ममता महिला गृह येथे पाठविण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील,अपर पोलीस अधीक्षक,नंदुरबार विजय पवार,उप विभागीय पोलीस अधीकारी,नंदुरबार सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले,स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील,महिला सेलचे सहा.पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील परिविक्षा अधिकारी श्रीमती सुरेखा पवार व संरक्षण अधिकारी रविंद्र काकळीज,पोह/ दिपक गोरे,राकेश वसावे,जितेंद्र तांबोळी,महेंद्र नगराळे,पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन इमढेरे,जितेंद्र ठाकुर,सुनिल पाडवी,पोलीस शिपाई शोएब शेख,विजय ढिवरे,अभय राजपुत,आनंदा मराठे,रामेश्वर चव्हाण महिला सेल येथील महिला पोलीस हवालदार विजया बोराडे,प्रिती गावीत,अरुणा मावची जिल्हा विशेष शाखेचे महिला पोलिस नाईक पुष्पा वळवी,सुरेखा पाडवी तसेच पोलस मुख्यालय येथील सहा.पोलीस उप निरीक्षक सलीमोद्दीन काझी महिला पोलीस अमंलदार कावेरी सावळे यांच्या पथकाने केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा