Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिमतीला नवी कोरी गाडी रुग्णांच्या नशिबी मात्र भंगार गाडी...?
सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिमतीला नवी कोरी गाडी रुग्णांच्या नशिबी मात्र भंगार गाडी...?
तरुण गर्जना वृत्तसेवा धडगांव प्रतिनिधी धडगांव नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव येथील सरकारी रुग्णालयातील कर्मचारी चालक दिगंबर चटपल,क्लार्क भदाणेसह अनेक मित्रांनी मौज मजेसाठी रविवारची सुट्टीची संधी साधून तोरणमाळ येथे खाजगी ट्रीप काढली होती.
पण या ट्रीप साठी शासनाच्या वाहनाचा वापर करण्यात आला ही बाब सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारी मालमत्तेचा गैरवापर व कर्तव्यातील कसूर ठरणारी बाब आहे.या बहाद् दरांनी शासनाकडून मिळालेल्या नव्या वाहनाचा वापर स्वतःच्या खाजगी कारणांसाठी करून परिसरातील आदिवासी रुग्णांसाठी भंगार असलेल्या अॅम्बुलन्स ठेवण्यात आली म्हणजे शासनाने ज्या कारणांसाठी वाहन पुरवले त्या वाहनाचा दुरुपयोग करणाऱ्या अश्या कर्मचाऱ्यांवर नंदुरबार आरोग्य विभाग तात्काळ कारवाई करणार का ? याकडे परिसरातील आदिवासी नागरिकांचे लक्ष आहे .
धडगाव येथील रुग्णांना भंगार असलेल्या अम्बुलन्सने उपचारासाठी धडगांव येथून नंदुरबार येथे नेले.हा धक्कादायक प्रकार विरसा फायटर्सचे धडगांव महासचिव प्रदिप पावरा यांनी समोर आणला आहे धडगांव सरकारी रुग्णालयातील अॅम्बुलन्स रविवारची सुट्टीची संधी साधून रुग्णालयातीलच
कर्मचान्यांनी चक्क आपल्या मालकीचे वाहन समजून आपल्या मित्रांसह तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी आपली गर्मी कमी करण्यासाठी स्वतःची हाँस भागवण्यासाठी सरकारी वाहनाचा वापर केला.म्हणजे गाडी पण सरकारची डीझल पण सरकारचं मात्र मौज सरकारी कर्मचाऱ्यांची.ही बातमी कळताच बिरसा फायटर्स धडगांवचे पदाधिकारी यांनी लगेच धडगांव येथील सरकारी रुग्णालय गाठले.तेथे संबंधित अधिका - यांना जाब विचारून चांगलेच धारेवर धरले अधिकारी हा सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे देत होता,
परंतु त्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांने पोल खोलायला सुरुवात केली तेव्हा अधिकारी नरमला या सरकारी कर्मचाऱ्यांने आपला प्रामाणिकपणा दाखवत बिरसा फायटर्स धडगांव पदाधिकाऱ्यांना साथ दिली,त्यामुळेच संबंधित अधिकारी चांगलाच भांबरला,धडगांव सारख्या दुर्गम व आदिवासी भागात रुग्णांचे
हाल होऊ नयेत,म्हणून सरकारी दवाखान्यात अनेक सोयी सुविधा शासन उपलब्ध करुन देत आहेत,परंतु या सोयी सुविधांचा वापर हे रुग्णांऐवजी तेथील कर्मचारीच आपल्या वैयक्तिक जीवनाची मौज - मजा मारायला करत आहेत,असा आरोप बिरसा फायटर्सचे महासचिव प्रदिप पावरा यांनी केला आहे.
त्याला पुरावे प्राप्त झाल्यानंतर आरोप खरे ठरले आहेत,याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.अनेकदा रुग्ण भंगार अम्बुलन्स मध्ये धडगांव येथून नंदुरबार येथे नेतांना मरण पावले आहेत,तरी रुग्णांसाठी भंगार अॅम्बुलन्स वापरली जाते व चांगली अॅम्बुलन्स कर्मचाऱ्यांच्या मौज मजेसाठी तोरणमाळ अथवा अजून कुठे कुठे नेले जाते हे त्यांनाच माहिती,हे चुकीचे घडत आहे,तोरणमाळ येथे मजा मारायला अॅम्बुलन्स नेणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा,नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच बिरसा फायटर्स धडगांव शाखेने प्रशासनाला दिला आहे.
अॅम्बुलन्स या रुग्णांच्या सेवा करायला की कर्मचाऱ्यांना मजा मारायला ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तोरणमाळहून धडगांवला आल्यानंतर मजा मारण्यासाठी गेलेले मित्र कर्मचारी फरार झाले,फक्त चालक व क्लार्कच गाडीत सापडले,चालक यांनी मला न विचारता परवानगी न घेता परस्पर तोरणमाळ येथे अॅम्बुलन्स नेली , असे लेखी पत्र संबंधित प्रमुख डॉक्टरांनी बिरसा फायटर्सला दिले आहे.
लाखाची अॅम्बुलन्स रुग्णांसाठी न वापरता एैश करायला तोरणमाळ येथे नेली म्हणून लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.संबंधित कर्मचान्यांवर शासकीय वाहनाचा व मालमत्तेचा गैरवापर करणे,तसेच कर्तव्यात कसूर करणे.या सर्व बाबी बाबत गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी,अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
( वाचा सविस्तर पुढील अंकात )
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा