Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा येथील भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांना लोकमत तर्फे गौरव कर्तृत्वाचा आदर्श कार्यगौरव पुरस्कार प्रदान..!
शिंदखेडा येथील भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांना लोकमत तर्फे गौरव कर्तृत्वाचा आदर्श कार्यगौरव पुरस्कार प्रदान..!
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी धुळे येथील केशरानंद मंगल कार्यालयात आयोजित दै लोकमतच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील नामवंत मान्यवरांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला त्यात शिंदखेडा येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरज रवींद्र देसले यांना धुळे जिल्हा आदर्श कार्यगौरव पुरस्कार मनपा स्थायी समितीचे सभापती शितल नवले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे प्रा.सतिष पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर भामरे लोकमत चे संपादक रवी टाले आवृत्ती प्रमुख राजेंद्र शर्मा उपसंपादक चंद्रकांत सोनार लोकमत शिंदखेडा प्रतिनिधी भिका पाटील आदी उपस्थित होते.
शिंदखेडा येथील सुरज रवींद्र देसले यांनी अल्पावधीतच आपल्या सामाजिक कार्यातून ठसा उमटवला आहे विद्यार्थी दशेपासुन त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली सध्या ते भारतीय जनता युवा मोर्चाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या नेतृत्व करित आहेत. विद्यार्थीच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या धोरणामुळे ते समाजातील सर्व घटकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.समाजकार्याच्या जोरावरच त्यांना वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी शिंदखेडा नगरपंचायत मध्ये स्विकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत त्यांना भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे महाराष्ट्रातील आदर्श जिल्हाध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.राजकीय सामाजिक वाटचालीचे बाळकडू त्यांना वडील डॉ.रवींद्र देसले व आई सुरेखा देसले यांच्या कडून मिळाल्याचे ते अभिमानाने सांगतात. शिंदखेडा शहरातील तरुणाईने युवा नेतृत्व म्हणून स्वीकारले आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व भारतीय जनता युवा मोर्चाचे विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व शहरासह जिल्ह्यातील मित्र परिवारातर्फे अभिनंदन केले जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा