Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२
वासखेडी येथे 111 वृक्षांचा वाढदिवस वृक्षदिंडीने संपन्न
नविन 260 वृक्षांची लागवड
साक्री- तालुक्यातील वासखेडी येथे नुकताच 111 वृक्षांचा वाढदिवस वृक्षदिंडीने तर नवीन 260 वृक्षलागवड कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
वासखेडी हे गाव माळमाथा परिसरातील साधरणतः 4 ते 5 हजार लोकसंख्येच एक लहानसे गाव आहे. पावसाळा कितीही झाला तरी निचरा करुन न ठेवणारी जमीन असल्यामुळे नेहमीच दुष्काळाला सामोरे जावे लागते. दुष्काळाचे एकमेव कारण म्हणजे वृक्षतोड , पर्यावरणाचा ऱ्हास. हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून गावातील तसेच गावाच्या बाहेर नोकरी निमित्ताने गेलेला तरुण वर्ग यांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेत सन 2021 साली ग्राम विकास मंच अंतर्गत एक वृक्ष प्रगतीचा ' ही चळवळ उभी केली. एकत्र येऊन हा ग्राम विकास मंच स्थापन केला. प्रथम वर्षी 111 वृक्षांची लागवड व संवर्धन करत दरवर्षी गावात 18 जुलै रोजी वृक्षारोपण महोत्सव व वृक्ष संवर्धन शपथ कार्यक्रम साजरा करण्याचे निश्चित केले. यानुसार भजनी मंडळ व गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातुन वृक्षदिंडी काढून व प्रत्येक झाडाचे पुजन करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
ह्या टीम ने गेल्या वर्षी गावापासून ते अमरधाम पर्यंत 111 वृक्षांची लागवड केली. यात सर्वच्या सर्व वृक्षांचे संवर्धन झाले. या वृक्षांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करुन नविन 260 वृक्षांची लागवड करण्यात आली. या तीन दिवसीय उत्सवात सर्व दाते वृक्षसेवक, सर्वजण आपापली कामे तीन दिवस बाजुला ठेऊन कुठल्याही कामांची लाज न बाळगता आपलं सर्वस्व झोकुन काम करत होते. प्रत्येक जण कुणी डॅाक्टर, मोठमोठे व्यावसायीक, इंजीनिअर यांचेसह सर्व कष्टकरी शेतकरी वर्ग, तरुण मित्रमंडळ, जेष्ठ नागरीक, वारकरी संप्रदाय, महीला माता भगीनी, दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बाल गोपाल विद्यार्थी यांनीही मेहनत घेतली.
गावाच्या प्रवेश रस्त्यावर 260 आशीर्वाद वृक्षांची लोखंडी जाळीसहित लागवड केली. या टीमने निंब, वड, पिंपळ, अशी 100 टक्के ऑक्सिजन देणारीच वृक्ष लागवडीस घेतली आहेत जेणेकरून गावातील वातावरण हवा शुद्ध राहण्यास मदत होईल एक वृक्ष प्रगतीचा वासखेडी टीमने गावातील, नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले तसेच मित्रपरिवार अशा पर्यावरण प्रेमी कडून आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, कन्यावृक्ष अशा विविध निमित्ताने प्रत्येकी एका वृक्षासाठी 1100 रुपये देणगी घेतली जाते व त्या वृक्षांचे पुढील पालकत्व हि टीम पूर्णपणे सांभाळत असते. तो वृक्ष 100 टक्के जगवून दाखवतो. त्यामुळे वृक्ष लागवड करण्याचा दृष्टीकोन साध्य होतो व देणगी देणारे दात्यांना समाधान लाभते. यावेळी सर्व वृक्षदात्यांना वृक्षसेवकांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा