Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहरातील अंबिका नगर भागातील पाण्याचे टाकी समोरील शिवनगरी सुमारे 10 ते 15 वर्षांपूर्वीचे जुने पिंपळाचे झाड तोडणाऱ्या विरुद्ध योग्य ती कायदेशिर कारवाई होणे बाबत...
शिरपूर शहरातील अंबिका नगर भागातील पाण्याचे टाकी समोरील शिवनगरी सुमारे 10 ते 15 वर्षांपूर्वीचे जुने पिंपळाचे झाड तोडणाऱ्या विरुद्ध योग्य ती कायदेशिर कारवाई होणे बाबत...
शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर येथील अंबिका नगर भागातील ग्रामस्थ विनंती पूर्वक अर्ज करीतो की,शिरपूर येथील अंबिका नगर भागातील ( शिवनगरी ) 2 पिंपळाचे सुमारे 10 ते 15 वर्षापूर्वीचे जुने झाडे असुन,त्या ठिकाणी आम्ही नेहमी दररोज धार्मिक पुजा अर्चा करुन त्या ठिकाणी दिवा लावत असतो,तसेच त्या ठिकाणी मुंजोबाचे स्थान असून पिंपळाचे झाड हे मुंजोबाचे प्रतिक म्हणून अतिशय महत्वाचे मानण्यात आले व तसे हिंदू धर्मातील शास्त्रात वड ,औदुंबर ,पिंपळ ,बेल ही धार्मिक झाडे असुन त्यात प्रत्यक्ष भगवान विष्णु ,दत्त , महादेव अशा देवांचा निवास असतो . तसेच सध्या हिंदू धर्मातील महत्वाचा व पावन असा श्रावण महीना सुरु असून अशा श्रेष्ठ व पुजेच्या महिन्यात पिंपळाचे झाड तोडणे हे अतिशय पापाचे कृत्य होणार आहे.
तसेच सदर अंबिका नगर रोड लगत महादेव मंदिर तसेच मुस्लीम धर्माचे पिर बापाचे ठाणे देखील रोडावर आहे ते कोणत्याही प्रकारे त्रास दायक नसल्यास पिंपळाचे झाड देखील त्रास दायक ठरु शकत नाही.सदर पिंपळाचे झाड हे संपूर्ण अंबिका नगर मधील राहणाऱ्या ग्रामस्थाचे नागरीकांचे दैविक स्थान असुन पुजेचे ठिकाण आहे व त्या ठिकाणी नेहमी पुजा अर्चा केली जात असते तसेच चावदस तसेच पोर्णिमा या तिथींना देखील तेथे मोठया प्रमाणावर पुजा अर्चा केली जावुन मुंजोबा जेवू घालण्याचा कार्यक्रम ही केला तरी अशा परिस्थितीत अंबिका नगर ( शिवनगरी ) पाण्याचे टाकी जवळील भागातील पिंपळाचे झाड हे कोणत्याही परिस्थितीत तोडण्यात येवु नये पर्यायी रस्ता फिरवुन योग्य तो पर्याय निवडावा व सदरचे पिंपळाचे झाड हे तोडण्यापासुन थांबवण्यात यावे याही ऊपर सदरचे झाड तोडल्यास आम्हास आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागेल व त्याचे होणारे परिणामास शासन जबाबदार राहील.निवेदन देताना उपस्थित वावड्या पाटील, हिंदू राष्ट्र सेना शिरपूर
सागर पाटील,जितेंद्र पाटील,विजय पवार,गणेश बिरारी,रामभाऊ मराठे,
अमोल पावरा,अमोल शिंपी,कृष्णा मराठे,रोहित भोई,विपुल कलाल,
नक्षत्र पाटील,निलेश मराठे,वैभव कोळी
बंटी कोळी,राजा कोळी,विशाल सोनार
श्रीनाथ शिंदे,अतुल सोनार,तुषार बारी
बंटी माळी,पकज शेटे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा