Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

पोलीस नाईकसह 20 हजारांची लाच स्विकारतांना खाजगी पंटर सह लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात…!



धुळे प्रतिनिधी:तक्रारदार हे धुळे येथील रहिवाशी असुन जप्त केलेली ऍक्टिवा दुचाकी सोडण्यासाठी तक्रारदाराकडून पोलीस नाईक यांनी 70 हजार रूपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती पंटरामार्फत 20 हजार रुपये स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.


तक्रारदार हे धुळे येथील रहिवाशी असुन त्यांचे भावाचे लग्न असल्याने त्यांनी त्याचे मित्राकडून ऍक्टिवा दुचाकी वाहन लग्न पत्रिका वाटण्यासाठी सुमारे एक महिन्यापुर्वी आणली होती.दुचाकी वाहन त्यांनी घरासमोर उभे करुन ठेवले असता त्याचे ओळखीच्या दोन मुलांनी दहा मिनीटाकरीता कामासाठी वाहन घेऊन जातो असे सांगुन तक्रारदार याच्या भावाकडून दुचाकी घेऊन गेले होते.त्यानंतर सदर मुलांना दुचाकीसह पोलीस नाईक संजय जाधव नेमणूक सोनगीर पोलीस स्टेशन यांनी सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीत त्यांना रस्त्यावर अडवून त्यांच्या जवळून दारुच्या बाटल्याचे बुच मिळुन आल्याने त्यांनी दुचाकी धाहन सोनगीर पोलीस स्टेशन येथे जमा करुन घेवून त्या मुलांना सोडून दिले होते.

त्यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी सोनगीर पोलीस स्टेशन येथे जावून पोलीस नाईक संजय जाधव यांची भेट घेतली असता त्यांनी त्यांचे पोलीस स्टेशन येथे जमा असलेली दुचाकी वाहन सोडवण्यासाठी 75 हजार लाचेची मागणी करुन पैसे दिले नाही तर तक्रारदार यांच्या भाऊ विरुध्द गुन्हा दाखल होईल असे सांगितले होते.


 
तक्रारदार यांनी पोलीस नाईक संजय जाधव यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाला दि 3 ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती.तक्रारीनंतर पडताळणी दरम्यान तडजोडी अंती पंचासमक्ष पोलीस नाईक संजय जाधव यांनी 20 हजार रुपयांची मागणी करुन सदर लाचेची रक्कम सापळा रचू त्यांचे खाजगी पंटर ज्ञानेश्वर कोळी रा.देवभाने ता.जि.धुळे यांच्या हस्ते देवभाणे येथील जि.प शाळा समोरील रस्त्यावर स्विकारतांना रंगेहाथ लाचलुचपत पथकाने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे,राजन कदम,शरद काटके,कैलास जोहरे,भुषण खलाणेकर, संतोष पावरा,भुषण शेटे,गायत्री पाटील ,संदीप कदम,रोहीणी पवार,रामदास बारेला,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर,प्रशांत बागुल,प्रविण पाटील, वनश्री बोरसे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध