Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

पांझरा कांन साखर कारखान्यात देखील देशाचा 75 वा अमृत मोहत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला



भारताच्या 75 व्या स्वातंत्रता अमृत महोत्सव देशभर आनंदाने साजरा होत असताना साक्री तालुक्यातील स्पर्श शुगर मिल संचलित पांझरा कान साखर कारखान्यात देखील देशाचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. गेल्या 25 वर्षापासून पांझरा कान साखर कारखान्यावर दरवर्षी न चुकता 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दिवशी तिरंगा झेंडा फडकविला जातो परंतु यावर्षी त्यात एक वेगळेच नवचैतन्य दिसून आले. याचे कारण लोकांमधील उत्साहचे वातावरण यावेळी दिसून आले कारखान्यातील स्थानिक शेतकरी,कामगार,तरुण, विध्यार्थी आशा अनेकांनी विशेष उपस्थिती यावेळी दिसून आली येणाऱ्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हा कारखाना पूर्ववत चालू करण्याचा सर्वांनाच आशा लागून आहे आणि त्या निमित्ताने लोकांच्या अपेक्षांना एक मोठी साथ व जबाबदारी या तरुण तडफदार उद्योजका मार्फत मिळालेली दिसून येत आहे निश्चितच येणाऱ्या काळात तालुक्यात भरभराहट दिसून येईल यात कुठलीही शंका नाही आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास कारखान्याच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्पर्श शुगर मिल संचलित पांझरा कान साखर कारखाना भडणे लि. चे चेअरमन श्री.पवन मोरे साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कारखाना परिसरातील जिल्हा परिषद मराठी शाळा व माध्यमिक विद्यालययांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते या कार्यक्रमात विशेष उपस्थिती कारखान्याचे डेप्युटी डायरेक्टर धनंजय अहिरराव,नामदेवराव देसले,भाऊसाहेब सोनवणे,शिवाजीराव सोनवने, आर.एल.बोरसे सर,सुनील मोरे, मदन देवरे,अजिंक्य शिंदे, अजिंक्य अवतारी,दीपक बोरसे, एड.नरेंद्र मराठे,डॉक्टर आहेर, धीरज देसले,प्रवीण काकुस्ते, चंद्रशेखर अहिरराव तसेच कारखान्याचे सुरक्षा रक्षक,सफाई कामगार,माळी कामगार,आदींच्या उपस्थितीत कारखाना परिक्षेत्रात यावेळी स्वातंत्र्याच्या 75 अमृत महोत्सवाचा निमित्ताने कारखाना क्षेत्रात 75 झाडे श्री.मोरे साहेबांचा हस्ते लावण्यात आली.व माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमात अल्पोआहार देऊन त्यांना वह्या व पेनची वाटप करण्यात आले.


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध