Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२
शिंदखेडा तालुक्यातील सार्वे येथे C R P F जवानांच्या हस्ते ध्वजारोहण..!
शिंदखेडा तालुक्यातील सार्वे येथे C R P F जवानांच्या हस्ते ध्वजारोहण..!
शिंदखेडा प्रतिनिधी: भारतात स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण भारतात सादर केले जात आहे. भारतास स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झाले आहेत.यामुळे संपूर्ण भारतात घर घर तिरंगा हा कार्यक्रम तेरा ते 15 ऑगस्ट या तीन दिवस राबविण्यात आला.जनतेने देखील या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणे या कार्यक्रमास पूर्ण साथ देत उत्साहाने साजरा करण्यात आला.
तर शिंदखेडा तालुक्यातील सार्वे येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गुलाबराव देसले व सरपंच शरद पंडितराव भामरे यांनी एक नवीन विचारधारा समोर आणत प्रत्येक गावात ध्वजारोहण हे सरपंच यांच्या हस्ते होतो मात्र या विचारास नवीन चालना देत गावातील CRPF...F/192 बटालियन सैनिक रामचंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान त्यांना देण्यात आला.
ही संकल्पना सैनिकांसाठी व सेवानिवृत्त सैनिकांसाठी प्रेरणादायी ठरेल या उद्देशाने हा मान CRPF जवानाला देण्यात आला या कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रकाश देसले, शिक्षिका प्रतिभा माधव सोनवणे, सरपंच शरद पाटील ,व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य श्रीराम ढोमण पाटील,स्मिता शरद पाटील, इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत ग्रामस्थ या कार्यक्रमास हजर होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा