Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२
बोरगांव जि प शाळेत मोफत गणवेश वाटप..!
शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद मराठी शाळेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात आला.
या वेळी प्रमुख अतिथी जि प सदस्य श्री भरत पाटील व पं स सदस्य श्री निंबा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठी शाळेसाठी संरक्षक भिंत व शाळेच्या पटांगणात फेव्हर ब्लॉक निधी साठी जि.प व पं.स सदस्यांनी मदत करावी अशी विनंती उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
जि प सदस्य श्री भरत पाटील,पं स समिती सदस्य श्री निंबा पाटील,माजी सैनिक दगेसिंग राजपूत,उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांचा सत्कार शाळा प्रशासना तर्फे करण्यात आला. श्री भरत पाटील व श्री निंबा पाटील यांनी प्रत्येकी 500 रु विद्यार्थ्यांना लेखन साहित्य घेण्यासाठी देणगी दिली तसेच पोलीस पाटील मनोहर पाटील व उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी शाळेसाठी उपयोगी वस्तू भेट दिल्यात.
कार्यक्रमासाठी जि प सदस्य श्री भरत पाटील, पं स समिती सदस्य श्री निंबा पाटील, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, पोलीस पाटील मनोहर पाटील, शालेय समिती अध्यक्ष राजू भिल, ग्रा पं सदस्य तानकु भिल, गावातील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल झुलाल कोळी, कौतिक येशी, गुलाब फुला भिल, संजीव पाटील, प्रकाश न्हावी, संगणक परिचालक जितेंद्र राजपूत, ग्रा प सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविक शिक्षक श्री गणेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्रीमती अनिता जाधव यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा