Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

संजय राऊत यांना तुरुंगात टाकल्याबद्दल प्रकाश राजपूत शिरपूर यांनी वाटले पेढे



शिरपूर प्रतिनिधी:शिवसेनेचे प्रकाश राजपूत यांनी दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांना पेढे दिले आणि आनंद व्यक्त केला.संजय राऊत यांना तुरुंगात टाकल्याबद्दल प्रकाश राजपूत यांनी हे पेढे वाटले.राजपूत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चालक होते.

धुळ्यातून राजपूत हे दिल्लीत खास गेले होते. तिथे त्यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना पेढे दिले.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की,संजय राऊत यांनी खूप चुकीचे कामे केली.शिवसेना फोडली,संपवली.मी मोठ्या साहेबांकडे म्हणजे बाळासाहेबांकडे चालक म्हणून काम करत होतो. १९९३-२००० या काळात मी चालक म्हणून काम केले आहे.पण जे झाले ते चुकीचे झाले.

संजय राऊत यांच्यावर ईडीने रविवारी कारवाई केली.सकाळी राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आणि तब्बल ९.३० तास चौकशी करण्यात आली.त्यानंतर त्याच रात्री त्यांना अटक करण्यात आली.शिवसेनेतील ४० आमदारांसह एकनाथ शिंदे बाहेर पडल्यावर शिवसेनेत मोठे भगदाड पडले आहे.याला संजय राऊत जबाबदार आहेत,अशी टीका केली जात आहे.या चालकानेही असाच पवित्रा घेतला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध