Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा व पारितोषिक वितरण
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी तालुक्यातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,विद्यार्थी विकास विभाग,क्रीडा विभाग,रासेयो,म.दि. सिसोदे कला वाणिज्य महाविद्यालय नरडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिवस याचे ओचित्य साधून मॅरेथॉन स्पर्धा 5.की मी अंतरची आयोजित करण्यात आली.
स्पर्धे अगोदर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.समाधान पाटील यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली.नियम समजावून सांगितले तदनंतर महाविद्यालयाचे अध्यक्ष संजयकुमार सिसोदे यांनी स्पर्धेस हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली.या स्पर्धेत प्रथम,सतेंद्र सैंदाणे द्वितीय,हेमंत पाटील तृतीय, योगेश कोळी उत्तेजनार्थ प्रदीप बिरारी, ऋषिकेश चव्हाण वदोन अशी पारितोषिक काढण्यात आली.स्पर्धेला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला स्पर्धा संपल्या नंतर लगेच पारितोषिक वितरण महाविद्यालयात झाले.
या स्पर्धे समयी प्रा.डॉ.एस.पी ढाके,प्रा.डॉ.यू. जी.पाटील,प्रा.एम जे मासुळे,प्रा.डॉ.बी. एम पाटील,प्रा.व्ही.बी खैरनार,प्रा.ए.आर वसावे तसेच जुनियर महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
विशेष सहकार्य प्रा.अमोल महिरे यांनी केले.शिक्षकेतर कर्मचारी यांचेही योगदान होते.क्रीडा संचालक प्रा.एम. पी.नगराळे,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रदीप सोनवणे व प्रा दत्तात्रय धिवरे यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा