Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

शिंदखेडा येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा संपन्न..! मुलांमध्ये-निलेश माळी तर मुलींमध्ये पुनम माळी प्रथम..!


   
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी  येथील एस एस व्ही पी एस कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव तसेच एस एस व्हीं पी एस महाविद्यालयाचा क्रीडा विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - मेजर ध्यानचंद जयंती - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पाच किलोमीटर पुरुष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत माता व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व  महाविद्यालयाच्या स्थानिक कार्यकारणीचे अध्यक्ष बापूसो प्रफुल्ल कुमार  सिसोदे ,स्थानिक कार्यकारिणीचे उपाध्यक्ष अशोक  पाटील भाऊसाहेब सुरेश देसले  महाविद्यालयाचे प्राचार्य मा.प्रो. डॉ.तुषार मल्हारराव पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.प्रा.डॉ. एस.व्ही बोरसे,महाविद्यालय उपप्राचार्य एस टी राऊत आदी मान्यवरांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला.सदर स्पर्धेत  स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.यात क्रमशःमुलांमध्ये निलेश हिम्मत माळी- प्रथम, मन्यार रिजवान खाटीक- द्वितीय,शुभम पितांबर माळी- तृतीय,तर मुलींमधून पुनम खंडू माळी प्रथम,रंजना ज्ञानेश्वर गवळे- द्वितीय,वैशाली मोतीलाल पाटील तृतीय क्रमांकावर मान पटकावला. मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. 

स्पर्धा संपन्न झाल्यावर लगेचच मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणही झाले. यावेळी विजेत्यांना रोख ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
     
याप्रसंगी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार मल्हार पाटील यांनी ध्यानचंद यांच्या स्मृतींना उजाळा दिला व ध्यानचंद यांच्याप्रमाणे खेळाडू वृत्तीने खेळण्याचे व देशासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आव्हान केले.स्पर्धाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार पाटील, क्रीडा संचालक राहुल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.उमेश कुमार खैरनार डॉ.सचिन जाधव ,उपप्राचार्य डॉ.एस व्ही बोरसे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस टी राऊत व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध