Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी, वाल्मिक नगर व गुरुदत्त कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत ध्वजारोहण व झाकी सोहळा संपन्न..!



शिरपूर प्रतिनिधी:- शहरातील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी,वाल्मीक नगर व गुरुदत्त कॉलनी शाळेत ध्वजारोहण व झाकीचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवानिमित्त शाळेत ध्वजारोहण करण्यासाठी आशाताई बागुल, चावडा मॅडम व नरेंद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसापासून शाळेत विद्यार्थी व पालकांसाठी रांगोळी स्पर्धा,पोस्टर्स स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा व प्रश्नमंजुषा अशा स्पर्धांचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात आलेले होते.त्या वेगवेगळ्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक काढण्यात आलेले होते. 


त्या सर्व बक्षीसपात्र विद्यार्थी व पालकांना बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते त्या सर्व बक्षीसपात्र विद्यार्थी व पालकांना आज स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. विविध स्पर्धेमध्ये तीनही शाळेतील पालकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.बक्षीस समारंभ झाल्यानंतर तीनही शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर झाकीचे आयोजन केलेले होते. 

झाकीतील  विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावरील विविध थीम्सच्या माध्यमातून नृत्याविष्कार करून उपस्थित पाहुणे व पालकांची मने जिंकली व संपूर्ण शालेय परिसर देशभक्ती युक्त वातावरणांनी दणाणून टाकला.कार्यक्रमाच्या शेवटी नरेंद्र पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
          
कार्यक्रमासाठी गोपाल पाटील, गणेश साळुंके,रेखा सूर्यवंशी व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल न्हावी व स्नेहल शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध