Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२
खर्दे विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा..!
शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील खर्दे येथील आर.सी.पटेल प्राथमिक,
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सविताबेन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपसरपंच नितीन चौधरी, पोलीस पाटील सुरेश सोनवणे,माजी कॅप्टन डॉ. मोहन गुजर,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष गुजर ,काशिनाथभाई चौधरी,ग्रामसेवक बैसाणे,आजी-माजी सैनिक, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव, विद्यालयाचे प्राचार्य पी.आर.साळुंखे तसेच विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी ,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी इयत्ता 10 वी व 12 वी त नैपुण्य प्राप्त तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी यांना बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर झाकीचे सादरीकरण केले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पी.आर.साळुंखे व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती क्रांती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी बी धायबर ,अमोल सोनवणे,हितेंद्र देसले,ए.जे.पाटील, डी.एम.पवार, पी.एस अटकळे, बी. एस. बडगुजर, बी.एस.पावरा ,रमेश शिरसाठ,एल.बी.राजपूत,अनिल माळी, सुनीता सूर्यवंशी, सीमा जाधव,सुनंदा निकम,मनीषा पाटील ,रूपाली राजपूत,छाया पाटील,युवराज मिठभाकरे,राकेश पाटील यांनी प्रयत्न केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा