Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १४ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्यात शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्‘ने संभाषणाला होणार सुरुवात,राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा
राज्यात शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्‘ने संभाषणाला होणार सुरुवात,राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा
“हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील,” अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुधीर मुनगंटीवारांनी ही घोषणा केली.
या निर्णयाची घोषणा करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले,“वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसून भारतीयांच्या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे.१८७५ मध्ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्याकाळात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होते.‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्यक्त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले.”
“शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरू करणार”
“भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरू करणार आहोत. १८०० साली टेलिफोन अस्तित्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरू करतोय,”असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
आता हॅलो ऐवजी वंदे मातरम्’ने संभाषण सुरु करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. सांस्कृतिक कार्यविभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात येईल,असंही मुनगंटीवारांनी नमूद केलं.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा