Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे ग्राम विकास मंच ची स्थापना अध्यक्षपदी सुरेश सोनवणे तर सचिव पदी वसंत सोनवणे यांची निवड..!
शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे ग्राम विकास मंच ची स्थापना अध्यक्षपदी सुरेश सोनवणे तर सचिव पदी वसंत सोनवणे यांची निवड..!
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी
तालुक्यातील आदर्श गाव चिलाणे येथे ग्राम विकास मंचची स्थापना नुकतीच करण्यात आली.ग्रामविकास मंच चे मूळ उद्दिष्टे म्हणजे सामाजिक विधायक व गाव पातळीवरील विविध समस्या सोडवणे,नवयुवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे,गावातील मूलभूत गरजा सोडवणे यासाठी गावातील सर्व जाती धर्मातील नागरिकांची गाव सभा घेण्यात आली यात बाहेरगावी जे व्यवसाय निमित्त अथवा नोकरी निमित्त गेलेले नागरिक एकत्र येऊन ग्राम विकास मंचची स्थापना करण्यात आली गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मंचचे सदस्य उत्साहाने कामाला लागले आहेत.आपण बाहेरगावी राहतो आपल्या गावासाठी काहीतरी करावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावातील बाहेरगावी असलेले व्यावसायिक, शिक्षक,मुख्याध्यापक ,इंजिनिअर, डॉक्टर ,वकील ,कंपनीतील व्यक्ती एकत्र आले या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दिलीप सिंग गिरासे होते
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक शिवाजीराव पाटील,एन.टी.गिरासे, राजाराम पाटील ,गुलाबसिंग गिरासे, माजी सरपंच रवींद्र पाटील,विद्यमान सरपंच योगिता गिरासे,उत्तमराव पाटील, प्रभाकर सोनवणे,हंसराज पाटील तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेच्याप्रास्तविकातून मंच चे सदस्य प्रमोद पाटील चिलानेकर यांनी मंचच्या कार्याची माहिती दिली विविध योजना मंचामार्फत राबविण्यात येतील यात सर्व गावकऱ्यांचा सहभाग असेल यावेळी सामाजिक कार्यकर्ते हिम्मतराव पाटील,जगदीश परदेशी,यू.पी.सोनवणे, प्रभाकर पाटील,गुलाब गिरासे, संजय सोनवणे,भूपेंद्र शिंदे,वाल्मीक पाटील,
यांनी मंचच्या संदर्भात उद्दिष्ट जनतेसमोर मांडले.मंचचे प्रमुख सुरेश सोनवणे यांनी मंचचे ध्येय धोरण,
पोटनियम व नियम,कार्याची पद्धत आधी विषयांवर चर्चा केली.
यावेळी ग्राम विकास मंचच्या अध्यक्षपदी सुरेश सोनवणे यांची तर खजिनदार पदी अशोक पवार सचिव पदी वसंत सोनवणे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. वाल्मीक पाटील व प्रमोद पाटील चिलानेकर यांनी सूचना मांडली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक जे.के.पाटील यांनी केले.सभेत गावातील सर्व समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा