Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
पिंपळनेर शहरात पोलिस ठाण्यात गणेशोत्सव व नामसाप्ताह चा पार्श्वभूमीवर शांतता बैठकीचे आयोजन करण्यातआले
पिंपळनेर शहरात पोलिस ठाण्यात गणेशोत्सव व नामसाप्ताह चा पार्श्वभूमीवर शांतता बैठकीचे आयोजन करण्यातआले
पिंपळनेर शहरातील गणेशोत्सव व नामसप्ताह यात्रा महोत्सव निमित्त सर्वच मंडळाच्या पदाधिका-यांनी शांततेत साजरा करून सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा व एकोपा कायम राखून नियमांचे पालन करून कायदा व सूव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस उप विभागीय अधिकारी प्रदीप मैराळे यांनी येथील पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केले. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी पोलीस उप विभागीय अधिकारी प्रदीप मैराळे हे होते. तर याप्रसंगी सरपंच देविदास सोनवणे, उपसरपंच विजय गांगुर्डे, माजी जि.प.सदस्य ॲड.ज्ञानेश्वर एखंडे ,विठ्ठल मंदिर संस्थानचे मठाधिपती हभप योगेश्वर देशपांडे महाराज, माजी सभापती संजय ठाकरे, संभाजी अहिरराव, धनराज जैन,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व जहुर जहाॅगीरदार व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी श्री मैराळे यांनी बोलताना पुढे सांगितले की,गणपती मंडळांचे सदस्य हे अठरा वर्षापुढील असावे. गणपती स्थापनामंडपास लागून रस्ता मोकळा ठेवा.वीज जोडणीची विद्युत मंडळाची परवानगी घेऊन कनेक्शन घ्यावी. काही अनुचित घटना घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देत समाजकंटकापासून सावधान राहा.पोलीसांची नजर आहेच.मंडळाच्या सदस्याची यादी पोलीसाना द्या.तसेच यात्रोत्सवात मोकाट जनावराचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने करावा.मोकाट गुरांचा धक्का मूर्तीस लागणार नाही याची दक्षता घेऊन यासाठी दोन दोन स्वयंसेवक उभे करून काळजी घेणे गरजेचे आहे असे सांगून ध्वनीक्षेपकाबाबत मर्यादेचे उल्लंघन नको.तर वीज वितरण कंपनीने लोंबकळणा-या तारांची दुरूस्ती करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर वादग्रस्त व धार्मिक भावना दुखावतील अशा पोष्ट सोशील माध्यमातून पसरवून नयेत.तर शेवटी पोलीसांना ही भावना असतात, त्यांनाही सण साजरे करायची इच्छा असते म्हणून गणेश मंडळांनी कायदा व शिव व्यवस्थेच्या भान ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करावे व नाम सप्ताहात देखील कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पीआय श्री साळुंखे साहेब यांनी केले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा