Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या उपस्थितीत शिरपूरात 'हर घर तिरंगा' बैठक संपन्न..!
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या उपस्थितीत शिरपूरात 'हर घर तिरंगा' बैठक संपन्न..!
शहर व तालुक्यात भाजपा तर्फे जनजागृतीवर भर, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
शिरपूर : प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करावे, असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. ते शिरपूर येथील भाजपा कार्यालयात आयोजित हर घर तिरंगा अभियानसाठी झालेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. शहर व तालुक्यात बैठकीत भाजपा तर्फे जनजागृतीवर भर, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. बबनराव चौधरी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या काळात जनतेच्या घरावर, सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक संघटना पासून भारतीय ध्वज हा शासकीय, निमशासकीय, इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण करण्याची परवानगी नव्हती. झेंडा देशभक्तीचे, अस्मितेचे प्रतीक असतो. म्हणुन स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या कायदा 'झेंडा अधिनियम २००२ मुळे आज घराघरात झेंडावंदन होत आहे. अटलजींच्या सरकारने भारतीय झेंडा वंदना वरील सर्व निर्बंध २००२ मध्ये हटविले. काँग्रेस सरकारच्या अधिनियम १९५० च्या कायद्यानुसार ध्वजारोहण फडकविण्यासाठी फक्त शासकीय व प्रशासकीय कार्यलये, शाळा इत्यादी ठिकाणी करण्याची परवानगी होती. 'झेंडा अधिनियम प्रमाणे दि. २६ जानेवारी २००२ पासुन भारतीय ध्वज हा शासकीय, निमशासकीय, धार्मिक संघटना, वित्तीय, सामाजिक सर्व प्रकारच्या संस्था, रहिवाशी सोसायट्या, स्वता: च्या घरावर, सार्वजनिक चौकात आता फडकाविता येवु शकतो. देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्धापनदिना निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकविण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हि मोहीम सुरू केली असल्याचे देखील बबनराव चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी भाजपा तर्फे हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियानसाठी जनजागृती करण्यात येणार असुन हे अभियान शहर व तालुक्यात पक्षातर्फे यशस्वी करण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला असल्याचे आपले विचार व्यक्त करतांना सांगितले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, तालुका सरचिटणीस जितेंद्र सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, पं. स. सदस्य यतीश सोनवणे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, शहर चिटणीस राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, प्रभाकर कोळी, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, तालुका सरचिटणीस अजिंक्य शिरसाठ, मंजित पवार, शहर उपाध्यक्ष अनिल बोरसे, भानुदास चौधरी, जितेंद्र माळी, कुणाल माळी, राजुलाल मारवाडी, संजय पाटील, रविंद्र राजपुत, अमोल पाटील, शुभम सोनार यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा