Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
पांझरा कांन साखर कारखाना चालू होण्यासंदर्भात कासारे,कोकले आणि गणेशपुर या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचा अडचणींवर कारखान्याचे चेअरमन पवन मोरे यांच्याशी चर्चा करण्यात आली
पांझरा कांन साखर कारखाना चालू होण्यासंदर्भात कासारे,कोकले आणि गणेशपुर या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचा अडचणींवर कारखान्याचे चेअरमन पवन मोरे यांच्याशी चर्चा करण्यात आली
काल दि.7/8/ 2022 (रविवार) रोजी साक्री तालुक्यातील गेल्या 25 वर्षापासून बंद असलेला प्रकल्प पांझरा कान साखर कारखाना लि.(भाडणे) साक्री हा कारखाना भाडेतत्वावर 25 वर्षासाठी चालवण्यासाठी एक युवा उद्योजक श्री पवन मोरे साहेब यांना देण्यात आला आहे. तरी या संदर्भात तालुक्यातील शेतकरी,तरुण,कामगार,यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाली होती की कारखाना कधी चालू होणार,आमचे थकीत वेतन कधी मिळणार,असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात काहूर माजवत होती आणि याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी स्पर्श शुगर इंडस्ट्रीज संचलित पांझरा कान साखर कारखाना लि.भाडणे साक्री चे डायरेक्टर श्री पवन मोरे साहेब व डेप्युटी डायरेक्टर श्री.धनंजय अहिरराव व त्यांच्यासोबत आलेले सर्व पदाधिकारी यांनी यावेळी साखरी तालुक्यातील सर्व उत्पादक गावांना भेटी देण्याचे आयोजन केले होते. याची सुरुवात कालपासून झाली आणि प्रथमता कासारे गावापासून याची सुरुवात करण्यात आली. काल मुख्यत्वे तीन गावांना भेटी देण्याचे प्रयोजन करण्यात आले होते. त्यात कासारे,कोकले,आणि गणेशपूर या तिन्ही गावांना उसाचे क्षेत्र अधिक असल्यामुळे या गावांपासून शेतकरी भेटीची सुरुवात करावी असा मानस सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचा होता काल सकाळी 11 वाजेला कासारे ग्रामपंचायत येथे भेटीचे आयोजन करण्यात आले. गेल्या दोन तास चाललेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी आपल्या अनेक अडच अडीअडचणींचे समस्यांचे प्रश्न मोरे साहेबांसमोर उपस्थित केले आणि त्यावर सर्वांचे समाधान होईल अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्टीचा शंका निरसन करून एक सकारात्मक अशी चर्चा घडवून आणली. त्यामध्ये कारखाना चालू होण्यासाठी अजून किती वेळ लागणार नेमका शेतकऱ्यांनी ऊस कधी लावावा?ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रा.खते औषधे,बेणे मिळणार का ? यासंदर्भात देखील चर्चा झाली त्यानंतर साक्री तालुक्यातील तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्राधान्य द्यावं यावर देखील चर्चा करण्यात आली. त्यानंतर कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता आपल्याला साक्री तालुक्यासाठी सर्व समावेशक असे काम करायचे आहे.असे प्रतिपादन ही यावेळेस श्री मोरे यांनी केले. साक्री तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणी लक्षात घेता आपण त्यावर विशेष लक्ष घालून येणाऱ्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ कशी होईल सामान्य शेतकरी ऊस लावण्यास प्रोत्साहित कसे होतील व शेतकऱ्यांना त्या पिकाचा मोबदला वेळेवर जास्त प्रमाणात कसा मिळेल याची देखील तरतूद आपण केलेली आहे असेही त्यांनी यावेळी त्यांनी स्पष्ट केले. साखरेसोबतच कारखान्यात इथेनॉलचा ही मोठा प्लांट आपण आणणार आहोत यावर देखील आपले काम चालू आहे दिवाळीपर्यंत कामाला मोठ्या प्रमाणावर गती मिळेल आणि येणाऱ्या 2023-24 च्या हंगामात आपण पूर्णपणे गाळप करण्यासाठी तयार राहू असे आश्वासन यावेळी या तिन्ही गावांच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील गावातील ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांना आश्वासित करण्यात आले व शेतकऱ्यांचा भेटी घेत असताना अनेक अनुभव देखील माननीय मोरे साहेबांना आलेत लोकांच्या गरजा त्यांनी जाणून घेतल्या किंवा कारखाना हा विषय तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आणि भावनिक विषय आहे यावर देखील त्यांनी भाष्य केलं येणाऱ्या काळात निश्चितच साक्री तालुक्यासाठी आपण एक मोठं औद्योगिक साम्राज्य उभा करू आणि केवळ व्यावसायिक म्हणून मी या तालुक्यात आलेलो आहे मला कुठलेही राजकारण करायचे नाही असे देखील त्यांनी लोकांना संबोधित केले लवकरच साक्री तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आणि ऊस उत्पादक शेती विषयी तरुणांचे आकर्षण वाढवण्याचा ही प्रयत्न आपण करणार आहोत म्हणजे जेणे करून सुशिक्षित बेरोजगारांची प्रश्नावर आपण काही प्रमाणात का होईना सुधारणा आणण्याचा प्रयत्न करू असेही त्यांच्याकडून बोलण्यात आले तिन्ही गावाचा लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे पांझरा कांन साखर कारखाना लवखरच पूर्वव त चालू होईल असा विश्वास शेतकऱ्यांना देखील यावेळी वाटलं
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा