Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे आम आदमी पार्टी चा मिटिंग घेऊन विविध विषयांवर चर्चा करून नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व कार्यकारणी जाहीर
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे आम आदमी पार्टी चा मिटिंग घेऊन विविध विषयांवर चर्चा करून नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व कार्यकारणी जाहीर
शिंदखेडा प्रतिनिधी:दी.28/08/2022 रोजी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे आज आम आदमी शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली यावेळी आम आदमी शेतकरी सघटनेचे मार्गदर्शक सल्लागार श्री.श्रीकांत आचार्य साहेब,प्रदेश अध्यक्ष बिपीन पाटील साहेब, धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर अशोक पाटील ,शिवाजी पाटील साहेब,मोहन मनोरे,मोहन बोरसे याच्या मार्गदर्शना खाली बैठक घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करतांना मा.श्री.आचार्य साहेब म्हणाले की शेतकरी दरवर्षी 20 ते 25 हजार रुपये कर विविध मार्गाने केंद्र व राज्य सरकारला देतो आहे तर केंद्र सरकारने शेतकऱ्याला देण्यासाठी का म्हणून हात आखडता घ्यावा तसेच बियाणे,खते याच्याविषयी पण जागरूकता शेतकऱ्यांनी ठेवावी असे मार्गदर्शन केलं.
या बैठकीत पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष बिपिन पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण ज्यांच्यावर आठ वर्षांपूर्वी विश्वास ठेवून महाराष्ट्रात व केंद्रात सत्तेत बसवले यांनी आपले शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे आज शेतकऱ्याला स्वतःचा मालाचा भाव ठरवण्याचे स्वातंत्र्य नाही इतर सर्वांना स्वतःच्या मालाच्या किमती ठरवण्याचा स्वातंत्र्य आहे परंतु शेतकऱ्याला हे स्वातंत्र्य नाही ते स्वातंत्र्य आपल्याला मिळून घ्यायचे असेल तर संघटना मग दृष्टीने सर्व शेतकऱ्यांनी हे वेळ द्यावे सोडून एकत्र काम करणे गरजेचे आहे तसेच केंद्र शासनावर टीका करत असताना जो चांगले काम करते आहे.
त्याच्या पाठीशी पंतप्रधान सारख्या माणसाने किंवा उच्चपदस्थ व्यक्तीने एखाद्याची पाठ थोपटली पाहिजे परंतु तसे देशात होताना दिसत नसून उलट त्या माणसाचे पाय ओढवून त्याला बदनाम करण्याचे काम पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तींना शोभत नाही, ज्याच्यावरून असे दिसते की पंतप्रधानांना भविष्यात त्यांच्या होणारा पक्षाचे हार सतावत असेल म्हणून त्यांना झोप लागत नसेल म्हणून त्यांनी इडी व सीबीआय चा गैरवापर करून प्रत्येक विरोधकाला वेठीस धरण्याचे काम महाराष्ट्रात काय सहज सर्व देशात सुरू केलेले आहे एवढेच काम त्यांनी जर शेतकऱ्यांचा भल करण्याकरता किंवा धुळे,नंदुरबार जिल्ह्यावर ज्यावेळेलाही पंतप्रधान यायचे त्या त्या वेळी म्हणायचे नाशिकचा मैने प्याज खाया है मै कभी गद्दारी नही करुंगा तुम लोगोसे आज आठ वर्षे लोटली तरी त्यांना कांद्याचा भावाचा प्रश्न सोडवता आला नाही तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्या मिटींगला करणार होतो हमी भाव देणार होते.
शेतकऱ्यांच्या उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार होते 2022 पर्यंत प्रत्येक गरीब कुटुंबाला राहण्यासाठी घर देणार होते दरवर्षी बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देणार होते या सर्व गोष्टींचा पंतप्रधानांना विसर पडून फक्त आपलं सरकार कसं स्थिर राहील आणि दुसऱ्याचा सरकार कसं पाडू एवढेच विचार लक्षात येतात का आज तरुणांच्या हाताला काम नाही तरुण बेरोजगार झाला असून लवकरच बेरोजगारांना काम मिळाले नाही तर भारतात बेरोजगारीचा उद्रेक होऊन कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या गाड्या फोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला असून आता तरी राज्य आणि केंद्र सरकारने जागे व्हावे महाराष्ट्रातील व देशातील सुशिक्षित बेरोजगाराला आता नेतृत्वावर विश्वास राहिला नाही थोडा पार्क या नेतृत्वांवर विश्वास आहे.
त्यांनी तरी हातात तरुणांच्या मागे उभे राहून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी या देशात काम केले पाहिजे ते सोडून देशात विरोधकांचे कसे खच्चीकरण करावे एवढेच काम केंद्रातील व राज्यातील सरकारने सुरू ठेवले आहे का असा सवाल पाटील यांनी करून आता आपण शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपला वापर इतर कोणालाही करू देऊ नका आम आदमी पक्ष तुमच्या मुलांच्या शिक्षणापासून तुमच्या बियाणे खाते इतर गोष्टी त्या तुम्हाला अडचणीच्या वाटतात की आज याच्यामुळे तुमचे नुकसान होते अशा सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणार असून पुढे भविष्यात आपल्याला शेतीतही काही बदल घडवून आणून योग्य प्रकारे शेती कशी नफ्यातील आपला शेतमाल आपल्याला इतर बाजारपेठेत कसा विकता येईल किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना आयटी सेल द्वारे एक प्रशिक्षण वर्ग देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचे काम आम आदमी शेतकरी संघटना करेल असे प्रतिपादन केले
यावेळी आभार व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष ईश्वर अशोक पाटील यांनी सांगितले की 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या धुळे येथील मेळाव्यास धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून हजार हजार कार्यकर्ते जमा होतील त्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू असून त्यांनी उपस्थित सर्वांना आवाहन केले की हजार हजार पेक्षा जास्त लोक आपण कार्य करताना घेऊन मेळाव्यास यावे या मेळाव्यातून एक शेतकऱ्याला नवी दिशा मिळणार असून आम्ही सर्व आम अधिक पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू असे त्यांनी सांगितले पाहिजे बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष कैलास भदाणे,उपाद्यक्ष संजय बहिरम,साक्री ता.सचिव राजेंद्र सोनावणे,उपस्थित होते तसेच बोरीस येथील वैभव गिरासे, हिम्मत शंकर माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला तसेच शिंदखेडा तालुक्यातून अंजन विहिरे, वारूळ,पाष्टे,साक्रीतील दुसाने गावातील अनेक शेतकऱ्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा