Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२
एफ एम काशेलानी स्कूल मध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा..!
शेगाव शहर प्रतिनिधी: (उमेश राजगुरे) स्थानिक एफ एम काशेलानी स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात यावर्षी विविध उपक्रमांसह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आठवडा साजरा करण्यात आला. काशेलानी स्कूल मध्ये देखील आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले.
ज्यात ९ ऑगस्ट रोजी चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा मोहिमीची माहिती देण्यात आली त्यानंतर सामूहिक राष्ट्रगान घेऊन सर्व विद्यार्थी आणि शिक्षिकांनी शाळेची आणि परिसराची स्वच्छता केली.10 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन ला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना राखी बांधली.१२ऑगस्ट रोजी शाळेमध्ये फँसि ड्रेस स्पर्धा आणि आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १३ ऑगस्ट रोजी झाडांना राखी बांधणे, निबंध स्पर्धा आणि शहरातून प्रभात फेरी काढiण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप केले.१५ ऑगस्ट रोजी शेगांव ग्रामीणचे ठाणेदार श्री. राहुल जंजाळ सर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी नृत्य आणि भाषणे सादर केली.१७ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी शाळेचे मुख्याधापक श्री मा कुणाल काशेलानी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना मार्गदर्शन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा